---Advertisement---

गोल मटोल बनत चाललेल्या पृथ्वी शॉला चाहत्याकडून वजन कमी करण्याचा सल्ला, कमेंट व्हायरल

On: शनिवार, जून 11, 2022 11:41 PM
Prithvi-Shaw
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल संपल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये व्यस्त झाला आहे. रणजी ट्रॉफी २०२२ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबई संघाने तब्बल ७२५ धावांनी जिंकला आणि उपांत्य सामन्यात स्थान बनवले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने एक उत्कृष्ट झेल पकडला, पण तरीदेखील चाहत्यांना त्याला ट्रोल करण्याची संधी काही सोडली नाही.

मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील या सामन्याच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)ने उत्कृष्ट झेल पकडला. उत्तराखंडच्या पहिल्या डावातील ३९ व्या षटकात हा झेल पाहिला गेला. या षटकात दीक्षाशू नेगी फलंदाजी करत होता. मुंबईचा शम्स मुलानी या षटकात गोलंदाजी करत होता. शम्सचा एक चेंडू दीक्षाशू नेगीला योग्य पद्धतीने टाईम करता आला नाही आणि स्लिप्समध्ये झेल देऊन बसला. चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट स्लीप्समध्ये उभा असलेल्या पृथ्वी शॉच्या हातात गेला आणि त्याने देखील कसलीही चूक न करता झेल पकडला.

हा झेल तसा पाहिला, तर खूपच कठीण होता. पण शॉने डाव्या बाजूला डाईव्ह मारून तो पकडला. शॉने पकडलेला हा झेल जबरदस्त होता, यात कसलीही शंका नाही. त्याने दाखवेल्या चपळाईसाठी नक्कीच त्याचे कौतुक झाले पाहिजे. त्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकजण त्याचे यासाठी कौतुक करत आहेत, पण काहीजणांनी त्याला नक्कीच सुनावले आहे.

https://www.instagram.com/reel/Celirp1PtKn/?utm_source=ig_web_copy_link

शॉने घेतलेला हा झेल उत्कृष्ट असला तरी, नेटकरी मात्र त्याला ट्रोल करण्याची कुठलीच संधी सोडताना दिसत नाहीत. एका नेटकऱ्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “भाऊ थोडे वजन कमी कर, बाकी झेल मात्र उत्कृष्ट होता.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तू भारतीय संघाच्या युवा खेळाडूंपैकी सर्वात ओव्हरेटेड खेळाडू आहेस.” दरम्यान, पृथ्वी शॉ यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत होता. पण त्याला संपूर्ण हंगामात काही खास प्रदर्शन करता आले नाही. याच कारणास्तव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला संधी दिली गेली नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

दोन तीर अन् ६ निशाणे, पाकिस्तानने विश्वचषकाच्या शर्यतीत बलाढ्य संघांना पछाडले, बाबरचा संघ भारतावरही भारी

टी२० विश्वचषकासाठी दिनेश कार्तिकला भारतीय संघात निवडावे का? विश्वविजेत्या कर्णधाराने स्पष्टच सांगितले

विषये का! चक्क टी२० क्रिकेटमध्येही डबल सेंच्युरी ठोकण्याचा दम राखणारे ४ क्रिकेटर्स, एक भारतीयही सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---