---Advertisement---

पृथ्वी शॉच्या बेडवर मिळाली ‘ही’ वस्तू; चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

On: शुक्रवार, जून 18, 2021 6:20 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय कसोटी संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहे. अशातच पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

पृथ्वी शॉ हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या बेडवर एक डंबेल दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने “विलगीकरणातील आयुष्य,” असे लिहिले आहे. हा फोटो पाहताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Prithvi shaw trolled after 50 lbs dumbell found on his bed)

https://www.instagram.com/p/CQJPoatrNYN/?utm_source=ig_web_copy_link

त्याच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहिले की, “भावा डंबेलला उचलतात, झोपवत नाहीत. तसंही तू काय कमालीचं खेळतोस.”

अनेक चाहते पृथ्वी शॉचा डंबेल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. कारण त्याच्या डंबेलवर ५० असे लिहिले होते. अनेक चाहत्यांना असे वाटले की, ते ५० किलोचे डंबेल आहे. अनेकांना प्रश्न पडला होता की, पृथ्वी शॉ इतका वजनदार डंबेल कसा काय उचलू शकतो? परंतु हा ५० किलोचा डंबल नसून ५० पाऊंड्सचा आहे. ५० पाऊंड्स म्हणजे २२.५ किलो असते.

चांगल्या कामगिरीची अपेक्षा
पृथ्वी शॉकडून श्रीलंका दौऱ्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या दौऱ्यावर पृथ्वी शॉ, शिखर धवनसोबत सलामी फलंदाजी करताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांनी मिळून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर ३ टी- २० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्वाच्या बातम्या

WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा

नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स

भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---