रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही तुफानी शतकी खेळी केली. 379 धावांच्या या विक्रमी खेळीनंतरही पृथ्वी समाधानी नसल्याचे दिसून आले. खेळीनंतर बोलताना आपण निराश झाल्याचे तो म्हणाला.
रणजी ट्रॉफी 2022-2023 च्या एलिट बी गटातील मुंबई विरुद्ध आसाम या सामन्यात मुंबईने पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले. पृथ्वी शॉने एक हाती जबाबदारी घेत पहिल्या दिवशी नाबाद द्विशतक झळकावलेले. दुसऱ्या दिवशी त्याने आपली खेळी अशीच पुढे नेत कारकिर्दीतील पहिल्या त्रिशतकाला गवसने घातली. रियान परागने त्याला बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने 383 चेंडूंमध्ये 379 धावांची खेळी केली. यामध्ये 49 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. चिरंजी ट्रॉफी इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी ठरली.
या खेळीनंतर बोलताना पृथ्वी म्हणाला,
“खूप दिवसांपासून माझी 400 धावा करण्याची इच्छा होती. यावेळी ती संधी आलेली मात्र मी त्यात अपयशी ठरलो.”
रणजी ट्रॉफी इतिहासात एकाच खेळीत 400 पेक्षा जास्त धावा एकाच खेळाडूने बनवलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांनी 1948-1949 च्या हंगामात काठीयावाड संघाविरुद्ध नाबाद 443 धावांची खेळी केलेली.
या सामन्याविषयी सांगायचे झाल्यास मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 687 धावांवर आपला डाव घोषित केला. पृथ्वीच्या 379 धावांनंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने 191 धावांची खेळी केली. आपल्या पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या यजमान आसामने 1 बाद 129 धावा बनवल्या होत्या. सध्या मुंबईकडे पहिल्य डावात 558 धावांची आघाडी आहे.
(Prithvi Shaw Unhappy After Out On 379 In Ranji Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
पक्की माहिती, पंत नाही खेळणार आयपीएल! सौरव गांगुलींनी केले स्पष्ट