इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ लीड्सला पोहोचला आहे. भारतीय संघ शुक्रवारी (२० ऑगस्ट) लंडनहून लीड्ससाठी रवाना झाला होता. संघ बसमध्ये प्रवास करताना पृथ्वी शॉने या प्रवासाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये हिटमॅन रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव, शार्दुल ठाकूर अजिंक्य रहाणे दिसत आहेत. या फोटोंमध्ये एक फोटो आहे, त्यामध्ये पृथ्वी शॉ रोहित शर्माच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
हा फोटो शेअर करताना जाफरने प्रतिक्रिया दिली आहे की, “जे तरुण असतात ते पहिल्यांदा सीटसाठी विचारतात. जे दिग्गज असतात ते, असे बसतात.” जाफरच्या या पोस्टला चाहते प्रचंड पसंती देत आहेत.
Adults: Bhaiyya when you get off please give this seat to me.
Legends: 😜 #ENGvIND pic.twitter.com/XyKQMcDg3B— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 20, 2021
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी सलामीवीर शुभमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर गेले होते. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयने या दोन क्रिकेटपटूंना इंग्लंडला पाठवले.
https://www.instagram.com/p/CSy8bFVIxvL/
सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. नॉटिंघममध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळलेला कसोटी सामना अनिर्णित संपला. तर, लॉर्ड्स कसोटीत भारताने इंग्लंडला १५१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. त्याचबरोबर मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ निवडीसाठी उपबल्ध असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…
राजस्थान रॉयल्सला आणखी एक झटका, बटलरने घेतली आयपीएलमधून माघार
कोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल