शारजाह क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (०२ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४६ वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एकमेकांशी भिडले. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फारच कमी संधी राहिली आहे. या सामन्यादरम्यान बऱ्याच मजेदार घटना पाहायला मिळाल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीच्या पृथ्वी शाॅसोबत घडली आहे.
पृथ्वीसोबत ही घटना मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू असताना घडली. दिल्लीचा कागिसो रबाडा सामन्यातील १७ व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या कृणाल पांड्याने मिड विकेटच्या दिशेने हेवेमध्ये एक शॉट मारला. त्यावेळी मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी पृथ्वी शाॅ उभा होता आणि त्याला कृणालने मारलेला चेंडू दिसला नाही. या घटनेनंतर मैदानावरील सर्वच खेळाडू हैराण झालेले पाहायला मिळाले.
दिल्लीच्या गोलंदाजीवेळी पृथ्वी डोळ्यांवर काळा चष्मा घालून क्षेत्ररक्षण करत होता. कृणालने मारलेला चेंडू त्याच्या डाव्या बाजूने निघून गेला, पण पृथ्वीला त्याची खबरही लागली नाही. या घटनेनंतर तो स्वत: हैराण झालेला पाहायला मिळाला होता आणि त्याला प्रश्न पडला होता की, त्याला चेंडू कसा काय दिसला नाही. पृथ्वीने हा चेंडू सोडल्यानंतर गोलंदाजी करणारा रबाडा मात्र निराश झालेला दिसला होता. पण स्वत: पृथ्वीला आपल्या कृतीवर हसू फुटले होते.
Where’s the ball, Prithvi? https://t.co/tXs0KPMNgR via @ipl
— vinay (@eerashid98) October 2, 2021
दरम्यान, सामन्यात सुरुवातीला दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मुंबईला आमंत्रित केले होते. मुंबईने २० षटकांमध्ये १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्ससाठी श्रेयस अय्यरची ३३ धावांची नाबाद खेळी विजयामध्ये महत्वाची ठरली. तसेच गोलंदाज अक्षर पटेलने ४ षटकात २१ धावा देत ३ विकेट्स घेतले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. पटेलला सामन्यातील विजयानंतर ‘मॅन ऑफ द मॅच’ निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बचना ए हसीनों, दुबे आ गया’, सीएसकेला धू धू धुणाऱ्या शिवमला चाहत्यांचे हटके चीयर; व्हिडिओची चर्चा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ऋतुची विशेष खेळी, सामन्यांनतर सांगितला धडाकेबाज शतकामागचा ‘राज’
सॅमने टाकला ‘मून बॉल’, तर चेंडूला हवेत फटकावण्यासाठी फिलिप्स खूपच पळाला; पाहा मजेशीर व्हिडिओ