---Advertisement---

‘तळापासून सुरुवात केली, आता इथे आहे’, पृथ्वी शॉने स्वत:लाच गिफ्ट केली बीएमडब्ल्यू कार; पाहा फोटो

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 10:53 AM
---Advertisement---

नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. स्पर्धा झाल्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ देखील आपल्या घरी परतला आहे. तिथे तो मिळालेल्या रिकामा वेळेचा आनंद घेताना दिसून येत आहे. अशात त्याने स्वत:लाच मोठी भेटवस्तू दिली आहे, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक फलंदाजी करणारा हा फलंदाज सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकतीच त्याने नवीकोरी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. याचे फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

एका फोटोमध्ये तो कारची डिलिवरी घेताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो कार चालवताना दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये तो कारचा कव्हर काढताना दिसून येत आहे. यावर कॅप्शन म्हणून त्याने ‘तळापासून सुरुवात केली होती, आता इथे आहे…” असे लिहिले आहे. ही कार खरेदी केल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CVIQTkno849/?utm_medium=copy_link

पृथ्वी शॉ ची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी
आयपीएल २०२१ च्या हंगामात पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी काही महत्वपूर्ण खेळी केल्या. त्याने १५ सामन्यात ३१.९३ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या. या दरम्यान त्याने ४ अर्धशतक झळकावले होते. तर ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. या हंगामात त्याने ५६ चौकार आणि १८ षटकार देखील मारले आहेत. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला २४.६२ च्या सरासरीने १३०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान ९९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषक २०२१ मधील पहिली विकेट घेणारा बिलाल खान आहे तरी कोण? अशी राहिलीय कामगिरी

शाकिबचा टी२० विश्वचषकात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मलिंगाला ओव्हरटेक करत बनला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमानचा मोठा विजय; पीएनजीला १० विकेट्सने केलं पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---