मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात सनरायझर्स हैदाराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी (१७ मे) सामना झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने ३ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच हैदराबादने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात प्रियम गर्गने शानदार झेल घेतला. त्याच्या झेलाचे कौतुक होत आहे.
सनरायझर्स हैदराबादने मुंबईला (Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians) १९४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने चांगली सुरुवात केली होती. पण, मधल्या षटकात झटपट काही विकेट्स पडल्या. यात डॅनिएल सॅम्सच्या विकेटचाही समावेश होता. सॅम्सचा झेल गर्गने (Priyam Garg) अप्रतिमरित्या घेतल्याने त्याला विकेट गमवावी लागली.
ही घटना मुंबईच्या डावातील १५ व्या षटकात झाली. यावेळी या षटकातील अखेरचा चेंडू उमरान मलिकने (Umran Malik) वेगात टाकला होता. ज्यावर सॅम्सने (Danial Sams) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मिडविकेटवर उभा असणाऱ्या युवा प्रियम गर्गने उंच उडी मारत आणि दोन्ही हात उंचावून शानदार झेल घेतला. त्याचा हा झेलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सॅम्स ११ चेंडूत १५ धावा करून बाद झाला.
WHAT A CATCH!! 😮
Outstanding from Priyam Garg 👏 pic.twitter.com/wa3MjD7ROr #kohli #icc #tendulkar #viratkohli #didyouknow #iplt22 #viratkohli #viratkohli #didyouknow #klrahul
— Slogover (@slogoverindia) May 18, 2022
त्यानंतर टीम डेव्हिडने १८ चेंडूत ४६ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, तो धावबाद झाला. त्यामुळे मुंबईला २० षटकात ७ बाद १९० धावाच करता आल्याने पराभव झाला. मुंबईकडून सलामीला उतरलेल्या कर्णधार रोहित शर्माने ४८ धावांची खेळी केली. तसेच इशान किशनने ४३ धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे हैदराबादनेही प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १९३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तसेच प्रियम गर्गने ४२ धावांचे आणि निकोलस पूरनने ३८ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून रमनदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’
उमरान मलिकने मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स घेत बुमराहला पछाडलं, ‘या’ विक्रमात बनला अव्वल
‘त्याला सीपीआर दिला, वाचवण्यासाठी अगदी…’, बघा सायमंडच्या शेवटच्या क्षणी काय काय घडलं