Priyank Panchal Retired From First-Class Cricket: भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा स्टार खेळाडू प्रियांक पांचाळने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Priyank Panchal Retired From First-Class Cricket) देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणारा प्रियांक आता गुजरातकडून खेळू शकणार नाही. पांचाळला अनेक वेळा भारतीय कसोटी संघात सामील होण्याची संधी मिळाली. पण त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधीही स्थान मिळू शकले नाही. मात्र, आता त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
प्रियांकच्या प्रथम श्रेणीबद्दल क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने या फाॅरमॅटमध्ये 127 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 45.18च्या सरासरीने 8,856 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 29 अर्धशतकांसह 34 शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 314 राहिली.
– 127 matches.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2025
– 8,856 runs.
– 45.18 average.
– 29 hundreds.
– 34 fifties.
– 314* highest score.
PRIYANK PANCHAL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM FIRST CLASS CRICKET! pic.twitter.com/bPBAlVLYp0
प्रियांक पांचालची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्द-
127 सामने
8,856 धावा
45.18 सरासरी
29 शतके
34 अर्धशतके
314* सर्वोच्च धावसंख्या






