अलीकडेच झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स हे संघ आमनेसामने आले होते. ज्यामध्ये आयुष बदोनी आणि प्रियांश आर्य यांनी शतकी खेळी खेळली. प्रियांश आर्यने आपल्या शतकी खेळीत 6 चेंडूत 6 षटकार मारून इतिहास रचत खळबळ माजवला होता. दरम्यान आता प्रियांश आर्यने वादळी खेळीनंतर आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये त्याने आयपीएल व्यतिरिक्त विराट कोहली आणि त्याच्या आवडत्या संघाबद्दल बोलला आहे.
प्रियांश आर्य म्हणाला की मला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळायला आवडेल. कारण विराट कोहली माझा आवडता क्रिकेटर आहे. तो म्हणाला की, आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत आरसीबीला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथमच चॅम्पियन बनवण्यासाठी मी माझे 100 टक्के योगदान देईन.
स्पोर्ट्स यारीसोबतच्या संभाषणात प्रियांश आर्यने 6 चेंडूत 6 षटकार मारल्याची प्रतिक्रिया दिली. प्रियांश आर्य म्हणाला की तीन षटकारानंतर नाही. तर चौथ्या षटकारानंतर मला जाणवले की मी सहा षटकार मारू शकतो. त्यानंतर आयुष बदोनी म्हणाला की, फार क्वचितच एखाद्याला पहिल्या चार चेंडूंवर चार षटकार मारण्याची वेळ येते. त्यामुळे तु चान्स घे आणि प्रयत्न कर असं तो म्हणाला.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आयुष बदोनी आणि प्रियांश आर्य यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने 20 षटकात 5 विकेट गमावत 308 धावा केल्या. प्रियांश ओर्याने 50 चेंडूत शतकाचा टप्पा पार केला. तसेच त्याच्या इनिंगमध्ये त्याने सलग 6 षटकार मारले. प्रियांश आर्यशिवाय आयुष बदोनीने 55 चेंडूत 165 धावांची विक्रमी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 19 षटकार आणि 8 चौकार लगावले.
हेही वाचा-
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं 8वं पदक
T20 World Cup 2024; हा संघ प्रथमच टी20 विश्वचषकात सहभागी होणार
‘मी धोनीला माफ करणार नाही, मुलगा युवराजला भारतरत्न..’, योगराज सिंह यांचे वक्तव्य