---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद पटकावणाऱ्या न्यूझीलंडला किती रकमेचे मिळाले बक्षीस? घ्या जाणून

---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला गेला. भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ या सामन्यात आमनेसामने होते. पावसाच्या अडथळ्यामुळे या सामन्यात दोन दिवस वाया गेले होते. मात्र अखेर राखीव दिवशी म्हणजेच २३ जूनला या रंगतदार सामन्याचा निकाल लागला आणि न्यूझीलंडने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्यावाहिल्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

जवळपास तीन वर्ष सुरू असलेल्या या बहुचर्चित स्पर्धेचा आज अखेर विजेता मिळाला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीतर्फे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेच्या विजेत्याला नक्की किती बक्षीस रक्कम मिळाली, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

‘इतक्या’ रकमेचे मिळाले बक्षीस
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला. मात्र या सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली. या स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यावर न्यूझीलंडच्या संघाला ११.७२ कोटी रूपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर उपविजेते ठरलेल्या भारतीय संघाला ५.८५ कोटी रूपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला असता तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद मिळाले असते. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विजेतेपदाची रक्कम विभागून देण्याची तरतूद करण्यात आली होती.

या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघांना देखील बक्षीस रक्कम मिळणार आहे. यात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला ३.३ कोटी मिळणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाला २.५ कोटी आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाला १.५ कोटी मिळणार आहेत. याखेरीज उर्वरित ४ संघांना म्हणजे वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघांना प्रत्येकी ७३-७३ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

‘या’ कारणामुळे विराट WTC मध्ये फ्लॉप; माजी दिग्गजांनी दाखवून दिली कोहलीची चूक

चार दिवस दुखापतीसह खेळत वॅग्नरने न्यूझीलंड चाहत्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दिवस दाखवला

WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---