Pro Kabaddi 10: शनिवारपासून (दि. 2 डिसेंबर) बहुप्रतिक्षित प्रो कबड्डी 10 हंगामाला सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने तेलुगू टायटन्सला पराभूत करत विजय मिळवला. अशात स्पर्धेचा तिसरा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) अहमदाबादच्या ऍरेना स्टेडिअममध्ये पार पडला. या सामन्यात तमिल थलायवाज विरुद्ध दबंग दिल्ली संघ आमने-सामने होते. हा सामना तमिल थलायवाजने 11 पॉईंट्सच्या फरकाने जिंकला.
या सामन्यात दबंग दिल्ली (Dabang Delhi) संघाने नाणेफेक जिंकत तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाला प्रथम रेड करण्याचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1 खेळाडूने सुपर 10ची कमाल केली. तमिलसाठी अजिंक्य पवार याने 18 रेड पॉईंट्स मिळवले. तसेच, दिल्लीकडून कर्णधार नवीन कुमार याने 14 पॉईंट्स मिळवले, पण त्याचे प्रदर्शन व्यर्थ ठरले. त्यामुळे संघाला पराभावचा सामना करावा लागला. या दोन्ही खेळाडूंनी पीकेएल 2023 (PKL 2023) स्पर्धेतील त्यांचा पहिला सुपर 10 मिळवला.
तमिल संघाने पहिल्या हाफनंतर दबंग दिल्लीविरुद्ध 18-14ने आघाडी घेतली. सामन्यातील पहिली 20 मिनिटे पूर्ण रोमांचक राहिली. बराच वेळ सामना बरोबरीने सुरू होता, पण योग्य वेळी तमिल संघाने नियंत्रण मिळवत दिल्लीला ऑल-आऊटच्या बाजूने ढकलले. यानंतर दिल्लीच्या डिफेन्सने आधी नरेंदर कंडोलाला बाद केले आणि नंतर नवीनने सुपर रेड मारत तमिलचे तीन डिफेंडर्स बाद केले. त्यामुळे तमिल थलायवाजवर ऑल-आऊटची स्थिती उद्भवली, पण अजिंक्य पवारने नवीन कुमारला सुपर टॅकल करत बाद केले.
तमिलच्या उपकर्णधाराचा जलवा
दुसऱ्या हाफमध्येही तमिलवर सुरुवातीला ऑल-आऊट होण्याचा धोका होता, पण उपकर्णधार अजिंक्य पवार (Ajinkya Pawar) याने सुनीलला बाद करत आपल्या कर्णधाराला पुन्हा मिळवले. दिल्लीसाठी जेव्हा नवीनने रेड केली, तेव्हा यादरम्यान तमिलचे दोन डिफेंडर्स सेल्फ-आऊट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा तमिलवर ऑल-आऊटची स्थिती ओढवली. अजिंक्यने पुन्हा आपल्या संघाचा बचाव केला. त्याने सुपर रेड मारत 3 गुण (बोनस आणि 2 टच पॉईंट्स) मिळवले. यासोबतच त्याने आपला सुपर 10 देखील पूर्ण केला. तमिलच्या डिफेन्सने दिल्लीच्या रेडर्सला मोकळेपणाने खेळू दिले नाही आणि दुसरीकडे अजिंक्य पवारने सलग पॉईंट्स मिळवत दिल्लीला दुसऱ्यांदा ऑल-आऊटच्या दिशेने ढकलले.
????????????????????-ing the Thalaivas towards their first win of #PKLSeason10 ????#ProKabaddi #CHEvDEL #TamilThalaivas #DabangDelhiKC #HarSaansMeinKabaddi pic.twitter.com/ocXOggNr9S
— ProKabaddi (@ProKabaddi) December 3, 2023
सामन्यातील 30व्या मिनिटाला तमिलने दुसऱ्यांदा ऑल-आऊट केले. यासोबत त्यांची आघाडी 12 पॉईंट्सने वाढली. नरेंदर कंडोलानेही सुपर रेड (बोनस आणि 2 टच पॉईंट्स) मारली. दिल्लीच्या डिफेन्सने खूपच खराब प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांना सामन्यात पुनरागमन करता आले नाही. नवीनने मल्टी पॉईंट्स रेड मारत आपला सुपर 10 पूर्ण केला. मात्र, नवीनचे प्रदर्शन पुरेसे नव्हते. कारण, त्याला सहकाऱ्यांकडून चांगली साथ मिळाली नाही. तमिलने शानदार पद्धतीने आपली आघाडी कायम ठेवली.
Eat ????
Sleep ????
Score points ✌️
Repeat ????Naveen Kumar's daily routine ????️#ProKabaddi #PKLSeason10 #CHEvDEL #TamilThalaivas #DabangDelhiKC #HarSaansMeinKabaddi pic.twitter.com/HCpi0cGsum
— ProKabaddi (@ProKabaddi) December 3, 2023
अखेरीस तमिल थलायवाजने सहजरीत्या हा सामना नावावर केला. या सामन्यात तमिलसाठी अजिंक्य पवारने दमदार प्रदर्शन करत संघाला एकूण 21 पॉईंट्स मिळवून दिले. त्याने 18 रेड्स आणि 3 वेळा टॅकल केले. तमिलने या सामन्यात 42 पॉईंट्स मिळवले, तर दबंग दिल्लीला फक्त 31 पॉईंट्सच मिळवता आले. त्यामुळे तमिल संघाने हा सामना 11 पॉईंट्सने जिंकला. (Pro Kabaddi 10 Tamil Thalaivas won by 11 points against Dabang Delhi )
हेही वाचा-
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याचे संघ जाहीर, सायली जाधव, विक्रम कदम करणार नेतृत्व स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धा । गोलफादेवी, शताब्दी स्पोर्टस्, गुड मॉर्निंग, शिवमुद्रा यांची कुमार गटात विजयी सलामी