मुंबई:- गोलफादेवी सेवा, शताब्दी स्पोर्टस्, गुड मॉर्निंग स्पोर्टस्, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर(पूर्व) च्या शिंदेवाडी येथे नवरात्रोनिमित्त सुरू झालेल्या ५४व्या कबड्डी महोत्सवातील कुमार
गटात गोलफादेवीने अमर क्रीडा मंडळाला ३८-३६ असे नमवित या मुंबईतील कबड्डी हंगामाची सुरुवात केली. आशुतोष जाधवच्या अष्टपैलू खेळने मध्यांतराला १९-१७ अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीला मध्यांतरानंतर मात्र अमरने कडवी लढत दिली. अमरच्या रमेश रायकरने नंतर मात्र गोलफादेवीला चांगलेच जेरीस आणले.पण संघाला विजयी करण्यास तो कमी पडला.दुसऱ्या चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निंगने श्री संस्कृतीला ३५-३४ असे चकवित आगेकूच केली.
याच गटात शताब्दी स्पोर्टस् ने जय भारत क्रीडा मंडळाचा ३७-३५ असा पराभव केला. शताब्दीकडून गणेश केवट, साहिल कदम, तर जय भारतकडून साहिल घोगरे, साहिल डगरे यांनी चतुरस्त्र खेळ केला. शिवमुद्रा प्रतिष्ठानने विशाल लाड, समीर पवार यांच्या चढाई-पकडिच्या जोरावर नवोदित मंडळाला ४८- ३३ असे नमविले. नवोदितच्या अथर्व सुवर्णा, सूरज यांना उत्तरार्धात सुर सापडला. पण तोपर्यंत सामना हातून निसटला होता. अन्य सामन्यात जय दत्तगुरुने अभिनव स्पोर्टस् ला ३२-१२ असे, तर श्रीराम क्रीडा विश्वस्तने यंग विजयचा ३६-०२ असे पराभूत करीत आपली विजयी घोडदौड सुरू केली. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे कबड्डीप्रेमी आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. (self Mohan Rajaram Naik Gold Cup Kabaddi Tournament. Golfadevi, Shatabdi Sports, Good Morning, Shivamudra’s winning salute in the young group.)
अन्य निकाल व्यावसायिक प्रथम श्रेणी १)रिझर्व्ह बँक वि. वि. गंधेकर इलेक्ट्रिक(३९-२४), २) चिंनु स्पोर्टस् वि. वि. अत्रेय स्पोर्टस्(४४-३२).
महत्वाच्या बातम्या –
इकाना स्टेडियमवर सामना पाहायला आलेल्या चाहत्यांची गैरसोय, स्टॅन्डमध्ये इजा होता-होता राहिली
ग्राऊंड स्टाफला मदत करण्यासाठी सरसावला वॉर्नर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल