---Advertisement---

ऋतू-रहाणेचा झंझावात! SMAT मध्ये महाराष्ट्र-मुंबईची विजयी सुरुवात

---Advertisement---

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सोमवारी (16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई संघाने दणदणीत विजय मिळवत चांगली सुरुवात केली.

https://twitter.com/BCCIdomestic/status/1713924981045051577?t=-PPP8lNsUXI7tVLke4rK3w&s=19

मुंबई विरुद्ध हरियाणा अशा झालेल्या अ गटातील या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिला. पावसामुळे प्रत्येकी 18 षटकांच्या झालेल्या या सामन्यात हरियाणा संघाने प्रथम फलंदाजी केली. हरियाणासाठी हर्षल पटेल व कुमार यांनी 67 धावांची चांगली सलामी दिली. मात्र, त्यानंतर निशांत सिंधू वगळता इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांचा डाव 147 धावांवर संपुष्टात आला. मुंबईसाठी तनुष कोटीयानने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल व अंगकृश रघुवंशी हे अनुक्रमे 12 आणि 26 धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने आक्रमण करत केवळ 43 चेंडूंमध्ये नाबाद 76 धावा केल्या. त्याला शिवम दुबेने 26 धावा करून साथ दिली.

दुसरीकडे महाराष्ट्राच्या संघाने बंगालचा पराभव करत विजयाने प्रारंभ केला. बंगालने कर्णधार घरामी व खैरा यांच्या खेळीमुळे 158 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रासाठी ऋतुराज गायकवाड याने केवळ 40 चेंडूंमध्ये 82 धावा कुटल्या. यामध्ये नऊ चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार केदार जाधव याने शानदार खेळ दाखवत संघाला विजय मिळवून दिला.

दिवसातील इतर सामन्यांमध्ये सौराष्ट्र, बडोदा, रेल्वे, छत्तीसगड, गुजरात व विदर्भ यांनी विजय साजरे केले.

(Maharashtra And Mumbai Starts With Win In Syed Mushtaq Ali Trophy 2023 Rahane Ruturaj Shines)

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---