विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात समोरासमोर आले आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर मजबूत पकड प्रस्थापित करत श्रीलंकेचा डाव अवघ्या 43.3 षटकांमध्ये 209 धावांवर संपवला. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झम्पा याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
https://www.instagram.com/reel/Cydc0Aqv3wu/?igshid=MzRlODBiNWFlZA==
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस (Kusal Mendis) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करणे योग्य समजले. यावेळी त्यांच्याकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी पथुम निसंका (Pathum Nissanka) आणि कुसल परेरा (Kusal Perera) मैदानात उतरले होते. यावेळी दोघांनीही टिच्चून फलंदाजी केली. विशेष म्हणजे, दोघांनी शानदार अर्धशतकही झळकावले. त्यांच्यात शंभरहून अधिक धावांची भागीदारी झाली. परेरा आणि निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 130 चेंडूंचा सामना करताना 125 धावांची शतकी भागीदारी केली.
निसंका 61 धावा करून बाद झाल्यावर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार कुसल मेंडीस व सदिरा समरविक्रमा या सामन्यात फारशी संबंध दाखवू शकले नाहीत. परेराने 78 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपला फास आवळला. ऍडम झम्पा याने 4 तर मिचेल स्टार्क याने दोन बळी मिळवून श्रीलंका फार मोठी धावसंख्या उभारणार नाही याची खात्री करून दिली. अखेर श्रीलंकेचा डाव केवळ 209 धावांवर संपुष्टात आला.
(Srilanka All Out On 209 After Century Stand By Openers Zampa Took 4 Wickets)