वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 14व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी डावाच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने श्रीलंकेचा फलंदाज कुसल परेरा याला मंकडींग पद्धतीने धावबाद करण्याची चेतावणी दिली. आता यादरम्यानचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. नेटकरी स्टार्कच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करत आहेत.
नेमकं काय झालं?
झालं असं की, लखनऊमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात श्रीलंकेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी पथुम निसांका आणि कुसल परेरा (Kusal Perera) मैदानात उतरले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पहिले षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आला होता. यावेळी स्टार्क चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर एंडवर असलेला परेरा क्रीझवरून पुढे गेला. यावेळी स्टार्कने चेंडू टाकला नाही. त्याच्याकडे परेराला मंकडींग पद्धतीने धावबाद करण्याची संधी होती, पण त्याने त्याला बाद न करता फक्त ताकीद दिली.
https://www.instagram.com/p/CydFXTHPyce/
मंकडींग नाही, धावबादच
खरं तर, अलीकडच्या काळात क्रिकेट सामन्यादरम्यान मंकडींगने धावबाद करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, आयसीसीने अशाप्रकारे फलंदाजाला बाद केल्यावर त्याला मंकडींग (Mankading) नाही, तर थेट धावबाद (Run Out) असे अधिकृत नाव दिले आहे. म्हणजेच, अशाप्रकारे कोणताही फलंदाज बाद झाला, तर त्या विकेटला थेट धावबाद श्रेणीत ठेवले जाईल.
सोशल मीडियावर कौतुक
स्टार्कने जेव्हा परेराला चेतावणी दिली, तेव्हा त्यानेही आपली चूक मान्य केली आणि हसून स्टार्कच्या कृतीला सलाम ठोकले. अशात स्टार्कच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
Mitchell Starc shows grace and refuses to mankad Kusal Mendis. Respect earned ♥️♥️
Just a reminder that no Pakistan bowler has ran a batter like this ever. There are many other ways to dismiss him, but aisa nahin karna 👏👏 #CWC23 #AUSvSL #INDvsPAK pic.twitter.com/gFM0xjaSb9— Farid Khan (@_FaridKhan) October 16, 2023
Mitchell Starc warned Perera!!! pic.twitter.com/kW3o7ZwmkW
— Lubana Warriors (@LubanaS49) October 16, 2023
सामन्यात बदल किती?
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ एकाही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. तसेच, श्रीलंका संघात 2 बदल झाले आहेत. नियमित कर्णधार दसून शनाका आणि मथीशा पथिराना बाहेर पडले असून त्यांच्या जागी चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमारा यांना संधी मिळाली आहे. (odi world cup 2023 pacer mitchell starc has given a warning to kusal perera refuses to mankad)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! 120 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, ‘या’ खेळांनाही हिरवा कंदील
कोण मिळवणार पहिला विजय? 14व्या सामन्यात लंकेने जिंकला टॉस, ‘एवढ्या’ बदलांसह भिडणार कांगारूंशी