मुंबई | आज प्रो-कबड्डीच्या 6व्या हंगामासाठी दिपक निवास हुडाला जयपुर पिंक पॅंथरने चक्क 1 कोटी 15 लाख रुपये देऊन संघात घेतले. त्याला संघात घेण्यासाठी दबंग दिल्ली, हरीयाणा स्टीलर्स आणि जयपुर पिंक पॅंथर्सने जोरदार चुरस दिसली.
त्याला तामिल थलाईवाजने 30 वरुन थेट 70 लाखांची बोली लावली. त्यानंतर तमिल थलाईजा यातुन बाहेर पडले. जयपुर पिंक पॅंथरचा मालक अभिषेक बच्चन मात्र त्याला संघात घेण्यासाठी जास्त उत्सुक दिसला.
तु या एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार असे विचारले असता दिपक म्हणाला, ” मला एवढी मोठी रक्कम मिळाली याचा मला आनंद होत आहे. माझ्या बहीणीची मुले माझ्याकडे राहतात. मी त्यांच्या शिक्षण तसेच इतर गोष्टींची काळजी घेतो. त्यामुळे मी हे पैसे त्यासाठी वापरणार आहे आणि मी याचा सर्व आनंद त्यांच्यासोबतच साजरा करणार आहे.”
पुणेरा पलटणबद्दल बोलताना भावुक झालेला दिपक म्हणला, ” मी गेले तीन हंगाम या संघाकडून खेळलो आहे. मी नक्कीच या संघाला तसेच फॅन्सनाही खुप मिस करेन.”
दिपक गेल्या हंगामात पुणेरी पलटनचा कर्णधार होता. पहिले दोन हंगाम हा 24 वर्षांचा खेळाडू तेलुगु टायटन्स तर गेले तीन हंगाम तो पुणेरी पलटणकडून खेळत आहे.
2016मध्ये झालेल्या विश्वचषत विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. त्याने प्रो-कबड्डीमध्ये 81 सामन्यात 514 गुण घेतले आहेत तर 63 टॅकल गुण घेतले आहेत. त्याच्याकडे जयपुरचा भावी कर्णधार म्हणुन पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आणि तो बनला प्रो-कबड्डीमध्ये 1 कोटी मिळालेला पहिला भारतीय खेळाडू
–प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला
-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया
–संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली
–आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!