प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या तिसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) पहिला सामना हा ‘यू मुंबा’ आणि ‘दबंग दिल्ली’ संघात झाला. दबंग दिल्लीने सामन्यात जोरदार पुनरागमन करत ३१-२७ च्या फरकाने दिमाखात हा सामना खिशात घातला आहे. हा त्यांचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय आहे.
Tumhe jo Shivam ne dekha, tumhe jo usne chaha, jo point tha woh le gaya ????#MUMvDEL #vivoProKabaddi pic.twitter.com/DVUOCo3u1b
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2021
दबंग दिल्लीचा शानदार विजय
यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये यू मुंबाने दबंग दिल्लीवर आघाडी घेतली होती. ते १२-१० ने सामन्यात पुढे होते. मात्र पुढे दबंग दिल्लीच्या कबड्डीपटूंनी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि प्रतिस्पर्धांच्या मनोबल खच्ची करायला सुरुवात केली. परिणामी सामना दबंग दिल्लीच्या बाजूने वळला आणि त्यांनी ३१-२७ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.
महत्वाच्या बातम्या :
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
हे नक्की पाहा :






