---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१ : ‘यू मुंबा’कडून ‘बंगळुरु बुल्स’चा ४६-३० च्या फरकाने फडशा, हंगामात विजयी सलामी

U MUMBA
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगचा २०२१ चा हंगाम सुरु झाला आहे. बुधवार (२२ डिसेंबर) रोजी झालेल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ‘यू मुंबा’ संघाने प्रतिस्पर्धी ‘बंगळुरु बुल्स’ संघाचा ४६-३० च्या फरकाने फडशा पाडत हंगामातील पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे.

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. आठव्या हंगामातील पहिल्याच सलामीच्या लढतीत यू मुंबा (U Mumba) संघाने बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) संघाला पराभूत करत विजयी सलामी दिली.

हेही वाचा – आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय; ह्युगो बॉमॉस ठरला मॅचविनर

प्रो कबड्डीच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या हाफमध्येच ‘यू मुंबा’ने २४-१७ अशी आघाडी घेत बंगळुरु बुल्स संघाचे मनोबल खच्ची केले. पहिल्या हाफमध्ये ७ पॉइंट्सची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही ९ पॉइंट्सची भर घालून यू मुंबाने सामना ४६-३० च्या फरकाने जिंकला.

महत्वाच्या बातम्या :

ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला

Video: तब्बल २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज

– व्हिडिओ पाहा –

ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’ | Indian Cricket Batch of 1996

ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय 'बॅच ऑफ १९९६' | Indian Cricket Batch of 1996

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---