PKL 2023: मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील 20वा सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात बंगालने पटनाला 60-42च्या फरकाने वाईटरीत्या हरवले. तसेच, 4 सामन्यांमध्ये तिसरा विजय मिळवत गुणतालिकेतील पहिले स्थान गाठले. या सामन्यात एकूण 102 पॉईंट्स बनले. हा या हंगामातील एका सामन्यात सर्वाधिक पॉईंट्सचा विक्रमही आहे. बंगाल वॉरियर्सकडून 3 खेळाडूंनी सुपर 10 पूर्ण केला आणि पटनाच्या पराभवाचे कारण हेच ठरले. पटनाचा हा स्पर्धेतील तीन सामन्यातील पहिला पराभव आहे.
प्रो कबड्डी लीग 2023 (Pro Kabaddi League 2023) स्पर्धेतील या सामन्यात बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) संघाचा कर्णधार मनिंदर सिंग (Maninder Singh) याने 15, नितीन कुमार (Nitin Kumar) याने 14 आणि श्रीकांत जाधव (Shrikant Jadhav) याने 12 पॉईंट्स मिळवले. तसेच, पटना पायरेट्स (Patna Pirates) संघाकडून सुधाकर आणि सचिन यांनी प्रत्येकी 14 पॉईंट्स घेतले, पण डिफेन्समध्ये त्यांना साथ मिळाली नाही. डिफेन्समध्ये बंगालच्या शुभम शिंदे आणि पटनाच्या कृषण यांनी प्रत्येकी 4 टॅकल पॉईंट्स मिळवले.
पटनाचा सलग 2 विजयानंतर पहिला पराभव
पहिल्या हाफनंतर बंगाल वॉरियर्स संघ सामन्यात 27-16ने आघाडीवर होता. तसेच, त्यांच्याकडे 11 गुणांची आघाडी होती. पटनाने सामन्यात चांगली सुरुवात केली होती आणि 10व्या मिनिटाला पहिल्या ब्रेकवेळी ते 9-6ने पुढे होते, पण ब्रेकनंतर नितीन कुमारच्या सुपर रेडमुळे बंगाल वॉरियर्सने जबरदस्त पुनरागमन केले आणि त्यानंतर श्रीकांत जाधवनेही एक सुपर रेड करत संघाला पुढे नेले.
सामन्यात 14व्या मिनिटाला पटना संघ सर्वबाद झाला होता. मात्र, पटनाच्या सुधाकरनेही सुपर रेड करत संघाचे पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न केले, पण पहिल्या हाफनंतर बंगाल सामन्यात पुढे गेला. पहिल्या हाफमध्ये बंगालकडून मनिंदर सिंगने 9, श्रीकांतने 7 आणि नितीन कुमारने 6 रेड पॉईंट्स मिळवले.
सचिनने पीकेएलमध्ये आपल्या 800 रेड पॉईंट्स पूर्ण केले, पण पहिल्या हाफमध्ये तो फक्त 6 रेड पॉईंट्स घेऊ शकला. सुधारकरने पहिल्या हाफमध्ये रेडिंगने प्रभावित केले, पण पटनाचा डिफेन्स पहिल्या हाफमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला.
दुसऱ्या हाफमध्येही बंगालने चांगली सुरुवात केली आणि 22व्या मिनिटाला पुन्हा पटना संघ सर्वबाद झाला. बंगालसाठी मनिंदर सिंगने त्याचा 66वा सुपर 10 पूर्ण केला आणि संघाची आघाडी कायम ठेवली. 30व्या मिनिटाला झालेल्या ब्रेकवेळी बंगाल संघ सामन्यात 41-29ने पुढे होता. तसेच, पटनाला पुनरागमनाची आशा जवळपास संपुष्टात आली होती.
ब्रेकनंतर 32व्या मिनिटाला पटना पायरेट्स सामन्यात तिसऱ्यांदा सर्वबाद झाला आणि त्यांच्याकडे सामन्यातून एक पॉईंट्स घेण्याची संधीही पूर्णपणे निसटली. मनिंदरनंतर श्रीकांतनेही त्याचा सुपर 10 पूर्ण केला आणि त्यानंतर नितीन कुमारनेही आणखी एक सुपर रेड करत आपला सुपर 10 पूर्ण केला. नितीनने 34व्या मिनिटाला एका रेडमध्ये 5 पॉईंट्स मिळवले.
पटनाकडून सुधाकरने 36व्या मिनिटाला दुसरी सुपर रेड केली आणि सुपर 10देखील पूर्ण केली. मात्र, संघाचा एकतर्फी पराभव वाचवू शकला नाही. पटनाकडून सचिननेही सुपर 10 पूर्ण केला, पण त्यामुळे संघाला काडीचाही फायदा झाला नाही. सामन्याच्या अखेरच्या क्षणी बंगालने आपला स्कोर 60पर्यंत नेला आणि दमदार विजय मिळवला. (pro kabaddi 2023 bengal warriors vs patna pirates 5 super 10s raiding in pkl 10 20th match read)
हेही वाचा-
PKL 10: अर्रर्र! कॅप्टन नवीन कुमारचे दमदार प्रदर्शन ठरले व्यर्थ, दबंग दिल्लीचा हरियाणाकडून 2 गुणांनी पराभव
PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर