---Advertisement---

बंगालच्या आक्रमणावर हरियाणाचा संयम भारी! गतविजेत्यांना दिला पराभवाचा धक्का

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 8:29 PM
bengal w
---Advertisement---

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगमध्ये शुक्रवारी (७ जानेवारी) पहिल्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वारियर्सची गाठ हरियाणा स्टीलर्स संघाशी पडली. पहिल्यापासून अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस हरियाणा स्टीलर्सने ४१-३७ असा विजय मिळवला.

सामन्याच्या सुरुवातीला १० मिनिटांमध्ये काहीसा संथ खेळ झाला. बंगालचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला सातत्याने अपयश येत होते. मात्र, संघाच्या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळ दाखवला. बर्थडे बॉय बचावपटू सचिन विठ्ठला याने पहिल्या हाफमध्येच पाच गुण मिळवले. पहिल्या हाफच्या अखेरीस बंगालकडे १८-१५ अशी आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये हरियाणा संघाने आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी पहिल्याच रेडमध्ये बंगालला ऑल आउट केले. त्यानंतर संघाच्या मितू व विकास कंडोला या रेडरनी सातत्याने गुण घेत आघाडी टिकवून ठेवली.

पहिल्या हाफमध्ये गुण मिळवण्यासाठी झगडताना दिसलेला मनिंदर दुसऱ्या हाफमध्ये गुण घेताना दिसला. त्याने सुपर टेन करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अष्टपैलू नबीबक्षने सुयोग्य साथ दिली. मात्र, विकास कंडोलाने दीड मिनिटे शिल्लक असताना दोन गडी बाद करत संघाचा विजय निश्चित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---