Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेंगलोर बुल्स ‘टॉप’वर! तेलगू टायटन्सच्या पदरी पुन्हा निराशा

January 23, 2022
in कबड्डी, टॉप बातम्या
bb v tt

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi


प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७४ व्या सामन्यात मजबूत बेंगलोर बुल्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने आले. पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगलोरने पहिल्या हाफमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवले. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तेलुगु संघाने पुनरागमन केले. मात्र, अखेरीस बेंगलोर बुल्सने ३६-३१ असा विजय साजरा करत अव्वल स्थान गाठले.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये बेंगलोर संघाने वेगवान सुरुवात केली. पवन सेहरावतने स्वतः जबाबदारी घेत सलगपणे गुण मिळवले. त्याने पहिल्या हाफमध्ये ११ गुण घेत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. तेलगू संघासाठी राकेश गौडा याने पहिल्या हाफमध्ये ५ गुण मिळवले. पहिल्या हाफच्या अखेरीस बेंगलोरकडे २२-११ अशी आघाडी होती.

पहिल्या हाफमध्ये मोठ्या फरकाने माघारलेल्या तेलगू संघाने दुसऱ्या हाफमध्ये चांगले पुनरागमन केले. आकाश, सुरींदर व आदर्श यांनी डिफेन्समध्ये योगदान देत तेलगू संघाला सातत्याने गुण मिळवून दिले. अखेरच्या दोन मिनिटात बेंगलोरकडे केवळ तीन गुणांची आघाडी शिल्लक होती. मात्र, दीपक नरवाल व सौरभ नंदल यांनी प्रत्येकी एक गुण घेत ही आघाडी वाढवत सामना बेंगलोरच्या पारड्यात टाकला.


ADVERTISEMENT
Next Post
sa 3rd odi

दक्षिण आफ्रिकेचा भारताला 'व्हाईटवॉश'! दीपक चहरची झुंजार खेळी व्‍यर्थ

MITALI

'या' प्रश्नावर मिताली राजचा सुटला संयम; पत्रकारांवर आगपाखड करत म्हणाली...

Team India

'सेना' देशांत टीम इंडियाचे तीन वर्षांपासून पानिपत!

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.