---Advertisement---

दिल्लीची फिनिक्स भरारी! यूपीवर मात करत अव्वलस्थान केले काबीज

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 8:30 PM
NAVVEN-KABADDI
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या चाळीसाव्या सामन्यात दबंग दिल्ली व यूपी योद्धा संघांची गाठ पडली. दिग्गज रेडर व डिफेंडर असले या दोन्ही संघातील सामना चांगलाच रंगला. पूर्ण वेळेनंतर या सामन्यात दिल्लीने ३७-३३ असा विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान काबीज केले.

प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर परदीप नरवाल व या हंगामातील सर्वात यशस्वी रेडर नवीन कुमार यांच्यावर या सामन्यात लक्ष होते. मात्र, सलग २६ सुपर टेन लगावलेल्या नवीनविरुद्ध यूपी संघाने चांगली तयारी केली होती. पहिल्या हाफमध्ये नवीन याला तब्बल पाच वेळा बाद करण्यात यूपी संघाने यश मिळवले. दुसरीकडे परदीपने ७ गुण घेत पहिल्या हाफमध्ये संघाला १८-१३ अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला नवीनने दोन गुण घेत पुनरागमन केले. त्याने सलग तीनदा दोन गुण घेत संघाला आघाडी मिळवून दिली. तसेच त्याने या हंगामातील सलग सातव्या सामन्यात सुपर टेन लगावला. युपी संघाचा सर्वच खेळाडूंनी नियमितपणे गुण घेत दिल्लीला मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवले. सामना संपण्यास दिड मिनिटे शिल्लक असताना मनजित छिल्लरने परदीप नरवालला बाहेर करत सामन्यात विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. अखेरचा एका मिनिटात दिल्लीच्या डिफेंडरने संयम दाखवत विजय निश्चित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---