प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ९३ व्या सामन्यात पहिल्या तीन संघातील बेंगलोर बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली असा सामना रंगला. नवीन कुमार व पवन सेहरावत या अव्वल दर्जाचा रेडर्समधील या सामन्यात अखेरीस ३६-३६ अशी बरोबरी पाहायला मिळाली.
बेंगलोरचा कर्णधार पवन सेहरावत व दिल्लीचा सुपरस्टार नवीन कुमार यांनी अपेक्षेप्रमाणे या सामन्याची सुरुवात रोमांचक केली. मात्र लवकरच दिल्लीच्या डिफेन्सने पवनला बाहेर करत आघाडी घेण्यास सुरुवात केली. पवन बाहेर गेल्याचा फायदा घेत दिल्लीने बेंगलोरला पहिला हाफमध्ये ऑल आऊट करण्यात यश मिळवले. याचे नुकसान पहिल्या हाफमध्ये बेंगलोरला,१८-१४ अशा फरकाने सोसावे लागले.
दुसऱ्या हाफमध्ये प्रेक्षकांना अगदी वेगळा पवन पाहायला मिळाला. त्याने आपल्या खोलवर चढायांनी दिल्लीला अक्षरशा नामोहरम केले. दुसऱ्या हाफच्या पहिल्या सात मिनिटात दोन्ही संघांकडून प्रत्येक रेडमध्ये गुण कमावले गेले. त्याचवेळी बेंगलोरच्या डिफेन्स नाही कर्णधार पवन ला सुयोग्य साथ देताना गुण कमावले. त्यांनी लागोपाठ दोन वेळा दिल्लीला ऑल आऊट करण्यात यश मिळवले. नवीन कुमारनेही सुपर टेन करत संघाला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला. अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना बेंगलोर ऑल आउट झाल्याने सामना ३४-३४ बरोबरीत आला. अखेरची ४० सेकंद शिल्लक असताना पवनने दोन गुणांची रेड करत दोन गुण कमावले. त्यानंतर दिल्लीने एक गुण मिळवला. मंजीत चिल्लरने पवनची पकड केल्याने सामना टाय झाला..