Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रो कबड्डी: गुजरात-युपी सामन्यात गुणांचा पडला पाऊस; ‘सदर्न डर्बी’ बेंगलोरच्या नावे

October 19, 2022
in कबड्डी, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi


प्रो कबड्डी 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यूपी योद्धाज व गुजरात जायंट्स गुणांचा अक्षरशा पाऊस पाडला. मोठ्या गुणसंख्येच्या झालेल्या या सामन्यात गुजरातने 51-45 असा विजय संपादन केला. तर, बेंगलोर बुल्स विरुद्ध तमिल थलाईवाज या दिवसातील दुसऱ्या सामन्यात बेंगलोरने 45-28 असा विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम राखली.

Chand came, Chand saw, 𝐂𝐡𝐚𝐧𝐝-𝐫𝐚𝐧 and took @GujaratGiants to a 𝐣𝐢𝐭𝐡! 😉

They jump to 5th spot following an impressive victory over @UpYoddhas 👏#vivoProKabaddi #FantasticPanga #GGvUP pic.twitter.com/8itMdwJ9Ag

— ProKabaddi (@ProKabaddi) October 19, 2022

 

बेंगलोर येथील कांतीरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी पहिला सामना अत्यंत वेगवान झाला. दोन्ही बाजूंनी रेडर्सने या सामन्यात आपली हुकूमत गाजवली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये युपी संघ 21-19 असा किरकोळ आघाडीवर होता. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये गुजरात संघाने सुरुवातीपासून वेग पकडला. पहिल्या चार सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या गुजरातच्या चंद्रन रंजीत याने या सामन्यात अक्षरशः यूपी संघाला सामन्यात मागे खेचले. दुसऱ्या हाफमध्ये अवघ्या चार मिनिटात त्यांनी युपीला दोनदा ऑल आउट करण्याची कामगिरी केल. मात्र, यूपीसाठी देखील सुरेंदर गिल व परदीप नरवाल यांनी तशाच प्रकारे कामगिरी करून दाखवली. पूर्ण वेळानंतर हा सामना गुजरातने 51-45 असा आपल्या नावे केला. गुजरातसाठी रंजीतने 20 तर एचएस राकेश याने 16 गुण मिळवले. युपीसाठी परदीप नरवालने 17 व सुरेंदर गिलने 14 गुण आपल्या नावे केले.

दिवसातील दुसरा सामना सदर्न डर्बीचा म्हणजे बेंगलोर बुल्स विरुद्ध तमिल थलाईवाज यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर बुल्सने या सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व राखले. भरत आणि विकास कंडोला यांनी सातत्याने गुण घेत बेंगलोर संघाला पिछाडीवर येऊ दिले नाही. तमिल थलाईवाजसाठी दोन युवा रेडर नरेंदर व हिमांशू यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, ते संघाचा मोठा पराभव टाळू शकले नाहीत.


Next Post
Ravindra-Jadeja

आता भल्याभल्या गोलंदाज अन् फलंदाजांची होणार पळता भुई थोडी, भारताच्या दिग्गज अष्टपैलूची ट्रेनिंग सुरू

Rohit-Sharma

पाकिस्तानविरुद्ध रोहितने आखला तगडा प्लॅन, मोठ्या सामन्यापूर्वी करून टाकला खुलासा

VIRENDER-SEHWAG

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143