---Advertisement---

गुजरातचा टायटन्सवर ‘जायंट’ विजय! राकेशचा चढायांमध्ये झंझावात

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 10:10 PM
hs rakesh
---Advertisement---

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात गुजरात जायंट्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने आले. गुजरातच्या एचएस राकेश याने अत्यंत आक्रमक रेडींग करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अखेरीस गुजरातने या सामन्यात ४०-२२ असा दणदणीत विजय साजरा केला.

सामन्याच्या सुरुवातीला गुजरातच्या एचएस राकेशने अत्यंत धमाकेदार सुरुवात केली. त्याला महेंद्र राजपूत सुयोग्य साथ देत होता. पहिल्या हाफच्या अखेरीस गुजरात संघाकडे २०-१३ अशी सात गुणांची आघाडी होती. पहिल्या हाफच्या पंधरा मिनिटांपर्यंत तेलगू संघ एकही डिफेन्स गुण मिळवू शकला नव्हता.

दुसऱ्या हाफमध्येही गुजरातने आपला झंझावात कायम ठेवला. संघाचा अनुभवी डिफेंडर परवेशने दुसऱ्या हाफमध्ये ५ गुण घेत संघाच्या आघाडीत भर घातली. बदली रेडर म्हणून आलेल्या रथनने पाच गुण घेत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह गुजरात संघ सातव्या क्रमांकावर पोहोचला. तर, तेलुगू संघाला आपल्या पहिल्या विजयासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---