---Advertisement---

पवन सेहरावतचा झंझावात कायम! बेंगलोरने नोंदविला सलग सहावा विजय

pawan sehrawat
---Advertisement---

जगातील सर्वात मोठे व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये ६ जानेवारी रोजी जयपूर पिंक पँथर्स विरूद्ध बेंगलोर बुल्स असा सामना झाला. दोन्ही मजबूत संघातील या सामन्यात बेंगलोर बुल्स संघाने सरशी साधली.

तुल्यबळ संघातील ही लढत सुरुवातीपासून वेगवान झाली. मात्र, पवन सेहरावत याने लागोपाठ गुण घेत बेंगलोर संघाला आघाडीवर नेले. पहिल्या हाफच्या अखेरीस बेंगलोर संघाकडे पाच गुणांची आघाडी होती. कर्णधार पवन सेहरावत याने कर्णधाराला साजेसा खेळ पहिल्या हाफमध्ये दाखवला.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला बेंगलोर संघाने जयपूरचा कर्णधार दीपक निवास हुड्डा याला बाहेर बसवत शानदार सुरुवात केली. पहिल्या हाफमध्येच सुपर टेन पूर्ण करणाऱ्या पवन सेहरावतने दुसऱ्या हाफमध्येही आपला झंझावात कायम ठेवला. संघाने पूर्ण वेळेत ३८-३१ असा विजय साजरा केला. पवन सेहरावतने १७ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. बेंगलोर संघाचा हा सलग सहावा विजय आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---