---Advertisement---

तमिल थलाईवाजने केला सहावा सामना टाय! जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड

On: शनिवार, जानेवारी 22, 2022 10:59 PM
jpp v tt
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात शनिवारी (२२ जानेवारी) तीन सामने खेळले गेले. तिसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व तमिल थलाइवाज हे संघ समोरासमोर आले. युवा रेडरच्या सामन्यात पूर्ण वेळेनंतर प्रेक्षकांना ३४-३४ असा टाय पाहायला मिळाला.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक खेळ दाखवला. दोन्ही संघ रेडींगमध्ये जबरदस्त कामगिरी करत होते. तमिलसाठी अजिंक्य पवार व मंजीत यांनी सातत्याने गुण घेतले. तर, जयपुरसाठी अर्जुन देशवालने एकट्याने झुंज दिली. पहिल्या हाफच्या अखेरीस तमिलकडे २०-१८ अशी आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये प्रेक्षकांना अत्यंत आक्रमक खेळ पाहायला मिळाला. अर्जुन देशवाल याने एकट्याने पुन्हा एकदा तमिलला सामन्यात मोठी आघाडी मिळवू दिली नाही. त्याला बिजेन्‍द्र याने साथ दिली. दुसरीकडे तमिलसाठी म्हणजे मंजीत व अजिंक्य पवार यांनी सुपर टेन पूर्ण केले. अखेरच्या दोन मिनिटात तमिलने अर्जुन व बिजेन्‍द्र यांना बाहेर बसवण्यात यश मिळवले. अखेरच्या डू ऑर डाय रेडवर जयपूरच्या नितीन रावल याने एक गुण घेत सामना १-१ असा टाय केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---