प्रो कबड्डीचा पाचवा मोसम २८ जुलैपासून सुरु होत आहेत. त्यामुळे सर्वच संघ सराव आणि संघाच्या कॅम्पमध्ये व्यस्त आहेत. प्रत्येक संघ आपला कर्णधार पाचव्या मोसमासाठी घोषित करण्याची गडबड करत आहे.
प्रो कब्बडीच्या पहिल्या मोसमाची विजेती असणाऱ्या जयपूर पिंक पँथरनेही आपला कर्णधार घोषित केला आहे. या मोसमात जयपूरच नेतृत्व करणार आहे अष्टपैलू खेळाडू मनजीत चिल्लर.
ही बातमी जयपूरचे प्रशिक्षक असणारे आणि गेल्या वर्षी भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ प्रशिक्षक बलवान सिंग यांनी दिली.
जयपूरचा मालक अभिषेक बच्चन असून ह्या संघाचं व्यवस्थापन जीएस एंटरटेनमेंट वर्ल्डवाइड ही कंपनी पहाते. मनजीत चिल्लरला करारबद्ध करण्यासाठी जयपूरने तब्बल ७५.५० लाख रुपये मोजले आहेत.
जयपूरच्या संघात दोन अनुभवी खेळाडू असून त्यात पहिल्या मोसमात जयपूरला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेता नवनीत गौतम आणि बचावपटू सोमवीर शेखर आहेत. सोमवीर यापूर्वी पाटणा, बेंगळुरू आणि पुणे संघाकडून खेळाला आहे.