प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या नवव्या दिवशी (३० डिसेंबर) दुसरा सामना ‘हरियाणा स्टिलर्स’ आणि ‘बेंगळुरू बुल्स’ संघात झाला. बेंगळुरू बुल्सने ४२-२८ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे. पहिल्या हाफपासूनच बेंगळुरू बुल्सने सामन्यात आघाडी घेतली होती. ते पहिल्या हाफमध्ये ६ अंकांनी हरियाणा स्टिलर्सच्या पुढे होते.
https://twitter.com/ProKabaddi/status/1476585691836338177?s=20
यू मुंबाचा मोठा विजय
तत्पूर्वी नवव्या दिवसातील जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुंबा या सामन्यातील पहिल्या हाफपासूनच यू मुंबाने बढती घेतली होती. शानदार खेळाचे प्रदर्शन करताना ते पहिल्या हाफमध्ये २१-१२ अशा मोठ्या फरकाने आघाडीवर होते. पुढे जयपूर पिंक पँथर्सने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण ते इतक्या मोठ्या आघाडीला पार करू शकले नाहीत. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऋतुराजची ४ शतके ते धवनची अष्टपैलू कामगिरी, विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये बनले ‘हे’ ६ अद्वितीय विक्रम
विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार
टोकियो ऑलिम्पिक! भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
हेही पाहा-