प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) दुसरा सामना हा ‘पुणेरी पलटन’ आणि ‘तेलुगू टायटन्स’ संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने ३४-३३ च्या फरकाने बाजी मारली आणि स्पर्धेतील त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे.
Super raids, super tackles, super se bhi upar wala #SuperhitPanga! ????
The amount of 'Super' in this blockbuster was just ♾️ as @PuneriPaltan register a slender win against @Telugu_Titans ????#PUNvTT #vivoProKabaddi pic.twitter.com/1ewoX6esSg
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात
यूपी योद्धांचा जबरदस्त विजय
तत्पूर्वी पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झालेल्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये पटणा पायरेट्स यूपी योद्धांपेक्षा ३ गुणांनी आघाडीवर होता. त्याने पहिल्या हाफअंती २०-१७ ने आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धांनी जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ ३ गुणांनी मागे असलेल्या यूपी योद्धांनी पटणा पायरेट्ससोबत २५-२५ ने बरोबरी साधली होती. पुढे हेच प्रदर्शन कायम ठेवत त्यांनी ३६-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात
रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार