प्रो कबड्डी लीगचा ५ वा मोसम लवकरच क्रीडाप्रेमींच्या भेटीस येणार आहे. या वर्षीचा मोसम अजून जोरात होण्याची शक्यता आहे कारण या लीगमध्ये २ नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. १३० सामन्यांची ही लीग तब्बल ३ महिने चालणार आहे. ९३ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. त्यासाठीचा लिलाव २२ मे ला पार पडणार आहे.
पण लिलावात जाण्याआधी प्रत्येक संघाने मागील मोसमातील १ खेळाडू राखून ठेवला आहे. काही संघानी आपला प्रमुख खेळाडू राखीव ठेवला आहे तर काही संघाने राखीव ठेवलेला निर्णय भुवया उंचावणारा आहे.
पाहुयात कोण आहेत हे खेळाडू
१. पटणा पायरेट्स
मागील २ मोसमाचे विजेते पटणा पायरेट्सने त्यांचा स्टार रेडर प्रदीप नरवालला राखून ठेवला आहे. डुबकी किंग म्हणून ओळखला जाणारा प्रदीपने मागील वर्षीही संघासाठी बहुमूल्य गुण कमावले होते.
२. तेलगू टायटन्स
आतापर्यंतच्या मोसमात सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवणारा रेडर म्हणजेच राहुल चौधरी याला तेलगू टायटन्सने राखून ठेवला आहे. मागील मोसमात ही त्याने उत्तम कामगिरी केली होती.
३. जयपूर पिंक पॅन्थरस
अभिषेक बच्चनच्या या संघाने सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मागील संघातील एकाही खेळाडूला राखून न ठेवणे . त्याच्या संघात जसवीर सिंग आणि राजेश नरवाल सारखे खेळाडू असूनही त्याने आसा निर्णय का घेतला हे लीलावानंतर कळेल.
४. पुणेरी पलटण
मागील वर्षाचा पुणेरी पलटणचा कर्णधार मनजीत चिल्लरला पुण्याने राखून ठेवले नाही तर भारताचा उभरता रेडर आणि डिफेंडर दीपक हुडा याला पुण्याने राखून ठेवले आहे.
५. यू मुंबा
बाउन्सचा बादशहा मानला जाणारा आणि भारताच्या संघाचा कर्णधार अनुप कुमारला मुंबईच्या संघाने राखून ठेवले आहे. त्याच्या नेतृत्व खालीच मुंबईने २ वेळेस लीगचा अंतिम सामना गाठला होता.
६. बंगलोरू बुल्स
या संघाने आपल्या अष्टपैलू खेळाडू म्हणजेच आशिष सागवानला राखून ठेवले आहे. पिकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मोहित चिल्लरला डावलून बेंगॉलरने आशिषला राखून ठेवले आहे, या मुळे बऱ्याच क्रीडा प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
७. दबंग दिल्ली
दबंग दिल्लीने ही आपला स्टार विदेशी अष्टपैलू खेळाडू मिराज शेखला राखून ठेवले आहे. महाराष्ट्रातील काशिलिंग आडकेचा मागील वर्षाचा परफॉर्मन्स चांगला नसल्यामुळे दिल्लीसाठी हा निर्णय सोपा होता.
८. बंगाल वोररियर्स
कोरियन प्लेयर जंग कुंग ली या विदेशी रेडरला संघाने राखून ठेवले आहे. मागील वर्षीचा सुमार खेळ सुधारून या वर्षी चांगला खेळ करण्याचं आवाहन बंगाल पुढे असणार आहे.