---Advertisement---

सचिन तंवरच्या ‘गोल्डन रेड’ने पटनाचा टायटन्सवर थरारक विजय

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 9:42 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ३ जानेवारी रोजीचा दुसरा सामना पटना पायरेट्स व तेलगू टायटन्स यासंदर्भात खेळला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात पटना पायरेट्सने ३१-३० असा विजय आपल्या नावे केला.

पहिला हात मध्ये दोन्ही संघ बरोबरीने खेळत होते. मध्यंतराला पटना संघाकडे १८-१३ अशी आघाडी होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. तेलुगु संघासाठी कर्णधार रोहित अपयशी ठरत असताना अंकित बेनिवाल याने सुपर टेन पूर्ण केला. पटनासाठी सचिन व मोनू गोयत यांनी चमकदार कामगिरी केली. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना अंकित सुपर टॅकल झाल्याने पटना संघाने आघाडी मिळवली.

मात्र, त्याचवेळी पटना संघाचे प्रशिक्षक राम मेहर सिंग यांना खेळाच्यामध्ये सूचना केल्याने मैदानातून बाहेर घालविण्यात आले. तेलगू संघाने तीन गुण मिळवत सामना बरोबरीत आणला. मात्र अखेरच्या रेडवर सचिनने गुण मिळवत सामना पटनाच्या नावे केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---