---Advertisement---

प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो

On: मंगळवार, ऑक्टोबर 18, 2022 9:45 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (18 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व बंगाल वॉरियर्स आमनेसामने आले. जयपूरने या सामन्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवत 39-24 असा विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने 26-25 असा शेवटच्या क्षणी थरारक विजय आपल्या नावे केला.

विजयी लयीसह या सामन्यासाठी उतरलेल्या जयपूर व बंगाल संघाने सामन्यात बरोबरीने सुरुवात केली. मात्र, त्यानंतर जयपूरने वेगवान खेळ दाखवला. रेडर्स व डिफेंडर्सने एकसारखी कामगिरी केली. अर्जुन देशवालने आक्रमणाचे नेतृत्व केले. बंगालला कर्णधार मनिंदर सिंगचे अपयश भोवले. श्रीकांत जाधवने बंगालसाठी सर्वाधिक सहा गुण मिळवले. पूर्ण वेळेनंतर जयपुरने 39-24 असा विजय संपादन केला. अर्जुन देशवालने 10 घेत जयपूरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात मागील सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वास कमावलेल्या पुणेने तेलगू टायटन्सविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमण केले. सर्व खेळाडूंच्या थोड्या थोड्या योगदानासह पुणे संघाने पहिल्या हाफनंतर आघाडी मिळवली होते. दुसऱ्या हाफमध्येही पुणे संघ एकेरी दुहेरी गुणांसह आघाडीवर होता. अखेरचे सात मिनिट शिल्लक असताना तेलुगु संघाच्या विनयने चार गुणांची रेड करत संघाला सामन्यात प्रथमच आघाडीवर आणले. तरीही पुणे संघाने एक-दोन गुणांची आघाडी कायम राखली. अखेरच्या 15 सेकंदात पुणे संघाकडे एका कोणाची आघाडी होती. मात्र, तेलगू टायटन्सला सिद्धार्थ देसाईने एक गुण मिळवून दिला. परंतु, एक सेकंद शिल्लक असताना तो माघारी परतला. त्यामुळे पुणेला एक रेड मिळाली. या डू ऑर डाय रेडमध्ये अस्लम इनामदारने गुण घेत पुणेरी पलटणला सलग दुसरा विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---