---Advertisement---

९० गुणांच्या सामन्यात युपीची पलटनवर सरशी! मात्र, युवा अस्लम-मोहितने जिंकली मने

---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात सोमवारी (१७ जानेवारी) पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण व युपी योद्धा आमनेसामने आले. पहिला हाफमध्ये रोमांचक झालेल्या या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये युपीने धमाकेदार वर्चस्व गाजवत पुणे संघाला पराभूत केले.

फॉर्म येत असलेल्या या दोन्ही संघांमध्ये सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा सर्वांना होते. पहिल्या हाफमध्ये पुणे संघासाठी अस्लम इनामदार व यूपीसाठी डिफेन्समध्ये कर्णधार नितेशने उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या हाफच्या अखेरीस दोन्ही संघ २०-२० अशा बरोबरीत होते.

दुसऱ्या हाफमध्ये यूपी संघाने संपूर्ण सामन्याचा नूर पालटला. त्यांनी अवघ्या दहा मिनिटाच्या आतमध्ये पुणे संघाला दोनदा ऑल आउट केले. त्यांच्याकडे तब्बल १५ गुणांची आघाडी. पुणे संघासाठी अस्लम व युवा रेडर मोहित गोयत यांनी सुपर टेन करत संघर्ष केला. युपीसाठी सुरेंदर गिलने २० गुण आपल्या नावे केले. पूर्ण वेळानंतर यूपीने ५०-४० असा विजय नावे केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---