---Advertisement---

प्रो कबड्डी: पुणेरी पलटण-पटना पायरेट्स सामना टाय; पुण्याचे जबरदस्त कमबॅक

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 8:35 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात मागील हंगामाचे उपविजेते पटना पायरेट्स आणि पुणेरी पलटण हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी 34-34 अशा बरोबरीने सुरुवात केली.

बेंगलोर येथील कांतीरवा स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात पुणे संघाने वेगवान सुरुवात केली. मात्र, बाराव्या मिनिटाला पटनाने पुणे संघाला ऑल आउट करत आघाडी घेतली. परंतु, पुढील सहा मिनिटात पुणे संघाने जोरदार आक्रमण करत पटनाला ऑल आउट करत आघाडी मिळवली. पहिल्या सत्राचा खेळ संपताना पुणे संघ 22-16 असा आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात मात्र पटनाने पुणे संघाला आक्रमणाची संधी दिली नाही. लागोपाठ आठ गुण 10 गुण मिळवून त्यांनी पुणे संघाला दुसऱ्यांदा ऑल आउट केले. कर्णधार अस्लम इनामदार व मोहित गोयत यांना सातत्याने अपयश येत होते. परंतु अस्लमने जास्त काळ संघाला पिछाडीवर ठेवले नाही. पाठोपाठ पाच गुण घेत त्याने संघाला एका गुणांची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या पाच मिनिटात दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवला. पुण्याने अधिक संयम दाखवत एक वेळ पराभव वाचवत सामना टाय केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---