पुणे: प्रो कबड्डी लीगमधील पुणेरी पलटण संघाच्या जर्शीचे आज पुणे येथे अनावरण झाले. याप्रसंगी पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुडा, प्रशिक्षक बी.सी. रमेश, संघाचे सीईओ कैलाश कंदपल आणि फोर्स मोटर्सचे अशोक खोसला उपस्थित होते.
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी रेडींग मशीन म्हणून प्रसिद्ध असणारया २३ वर्षीय दीपक हुडा धुरा संभाळणार आहे. यावेळी पुणेरी पलटणच्या फॅन्सच्या हस्ते कर्णधार दीपक हुडाच्या जर्सीच अनावर करण्यात आलं.
पुणेरी पलटणच्या स्क्वाडमध्ये एकूण १८ खेळाडू आहेत. १३० दिवसांच्या या मोसमात पुणेरी पलटणने अनुभवाबरोबर तरुण खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणावर संधी दिली आहे.
सध्या पुणेरी पलटण संघाचा सराव हा पुण्यात सुरु असून सर्वात जास्त वेळ कॅम्प सुरु असलेला पुणेरी पलटण हा एकमेव संघ आहे. संघातील ताळमेळ नीट रहावा आणि खेळाडू मोठ्या मोसमात दुखापग्रस्त होऊ नये म्हणून संघाचा गेले दीड महिना पुण्यात कॅम्प सुरु असल्याची माहिती कर्णधार दीपक हुडाने दिली.
पुणेरी पलटण संघाचा जर्सी अनावरण समारंभ..!!#PuneriPaltan #ProKabaddi @PuneriPaltan @PuneriPaltan_FC @MarathiBrain @hashPune @HashTagMarathi pic.twitter.com/NbfiOwG8An
— Maha Sports (@Maha_Sports) July 12, 2017