---Advertisement---

गुजरात-थलाईवाज सामन्याने गाठली रोमांचकतेची परिसीमा! सुपर-सब प्रवीणच्या सुपर रेडने जायंट्स विजयी

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 8:37 PM
ajinkya-pawar
---Advertisement---

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या आठव्या हंगामातील ६६ व्या सामन्यात मागील पाच सामन्यांपासून पराभव न पाहिलेला तमिल थलाइवाज (Tamil Thalaivas) व मागील सामन्यात पराभवाची मालिका तोडून विजय मिळवलेला गुजरात जायंट्स (Gujrat Giants) हे संघ समोरासमोर आले होते. दोन्ही संघातील अटीतटीच्या सामन्यात गुजरातने ३७-३५ असा विजय मिळवून दिला.

सामन्याच्या सुरुवातीपासून गुजरात संघाने सामन्यावर वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली. महेंद्र गणेश राजपूत व राकेश नरवाल यांनी सातत्याने गुजरात संघाला आघाडीवर ठेवले. तमिल संघासाठी एकटा मनजीत झुंज देताना दिसून आला. पहिला हाफ संपण्याच्या काही मिनिटे अगोदर गुजरात संघाने तमिल संघाला ऑल आउट करत आघाडी कायम ठेवली. राजपूतच्या ६ व राकेशच्या ४ गुणांमुळे पहिल्या हाफच्या अखेरीस गुजरातकडे १७-१४ अशी आघाडी होती.

पहिला हाफप्रमाणे दुसरा हाफही अटीतटीचा राहिला. दोन्ही संघ सातत्याने गुण घेत राहिले. मात्र, तमिल संघाचा मनजीतने आक्रमक चढाया करत सांगाला सामन्यातून दूर जाऊ दिले नाही. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना तमिलने गुजरातला ऑल आउट करत चार गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतरही त्यांनी सातत्याने गुण घेणे सुरू ठेवले. राकेश नरवालने अखेरच्या दोन मिनिटात दोन गुणांची रेड करत सामना रंगतदार अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. बदली खेळाडू म्हणून म्हणून आलेल्या गुजरातच्या प्रदीप कुमारने सुपर रेड करत सामन्याला कलाटणी दिली. अखेरच्या काही सेकंदात सामना थरारक बनला. शेवटच्या रेडमध्ये गुजरातच्या महेंद्र गणेश राजपूतने सुपर रेड करत संघाला ३७-३५ असा विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---