आठव्या टी20 विश्वचषक (T20 World Cup)स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा एक संघ निश्चित झाला. बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तानने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. त्यांना आता भिडणार कोण यासाठी गुरूवारी (10 नोव्हेंबर) भारत-इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. या महत्वपूर्ण सामन्यासाठी खेळपट्टी कशी असले, दोन्ही संघांची एकमेंकाविरोधातील आकडेवारी, सामना कुठे प्रक्षेपीत होईल आणि कोणते खेळाडू अंतिम अकरामध्ये जागा बनवतील हे जाणून घेऊ.
पहिले तर भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे. त्याच्या 30 मिनिटांअगोदर नाणेफेक होईल. ही नाणेफेक जो गमावणार तो संघ जिंकणार असे समीकरण मागील 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांपासून या मैदानावर दिसले आहे. भारताने या मेदानावर दोन टी20 सामने खेळले. या दोन्ही सामन्यात विराटने नाबाद 90 आणि नाबाद 64 धावा केल्या होत्या. भारताने नाणेफेक गमावून दोन्ही सामने जिंकले होते. इंग्लंडनेही या मैदानावर 2011मध्ये टी20 सामना खेळला होता. तो या मैदानावरील पहिलाच सामना होता आणि इंग्लंडने यजमान संघाचा एक विकेटने पराभव केला होता.
दोन्ही संघांचीएकमेंकाविरोधातील आकडेवारी
भारत-इंग्लंड आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 22 वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारत 12 सामने जिंकत आघाडीवर असून इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. टी20 विश्वचषकातही हे दोन्ही संघ तीन वेळा भिडले, येथेही भारत दोन सामने जिंकत आघाडीवर आहे. तसेच दोन्ही संघामध्ये जुलै महिन्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. यामध्ये भारताने यजमान इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला होता.
वेदर आणि पीच रिपोर्ट
ऍलेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सूर्य चांगलाच तळपत आहे आणि उपांत्य फेरीच्या दिवशी सकाळी पावसाची शक्यता आहे, मात्र सामन्याच्या वेळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज सर्वाधिक आहे. या स्पर्धेसाठी गेल्या आठवड्यात तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या आहेत. त्यातील न्यूझीलंड-आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामन्यासाठी ज्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या त्यावरच उपांत्य सामना होण्याची अपेक्षा आहे.
नेहमीप्रमाणे, या स्पर्धेतील इतर ठिकाणांच्या तुलनेत ऍडलेडमधील आव्हान क्षेत्ररक्षण करताना जाणवते. कारण तेथे बाजूंना लहान चौकोनी सीमांचे संरक्षण आहे. या स्पर्धेत या ठिकाणी भारत (वि बांग्लादेश) खेळला असताना, इंग्लंडचा हा पहिलाच सामना असेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचा सुपर 12 मध्ये ऍडलेडमध्ये 157 च्या सरासरीने 4-2 विजय-पराजयाचा विक्रम आहे, जो फक्त पर्थ (125) आणि होबार्ट (117) यांच्यापेक्षा अधिक आहे.
सामन्याचे प्रक्षेपण-
टी20 विश्वचषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे अधिकार स्टार नेटवर्ककडे आहे. त्यामुळे भारतात हे सामने स्टार स्पोर्ट्स चॅनल्स आणि हॉटस्टारवर दिसतील. त्याचबरोबर दूरदर्शनही सामन्याचे प्रसारण करणार आहे. Probable playing XI for England-India semi-final; Know complete information in one click
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
इंग्लंडची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
ऍलेक्स हेल्स, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीचा सलग पाचवा विजय, जमशेदपूर एफसीला प्रथमच केले पराभूत
‘टी20 क्रिकेट अर्थहीन’; माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे अजब वक्तव्य