---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 6:56 AM
---Advertisement---

काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या हातून २२७ धावांच्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की यजमान भारतावर ओढावली होती. त्यामुळे आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईत सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उरतू शकतो. दुसरीकडे इंग्लंड संघदेखील त्यांची विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याजागी फिरकीपटू शाहबाज नदीमची संघात निवड करण्यात आली होती. परंतु अपेक्षेप्रमाणे तो खास कामगिरी करू शकला नाही. त्याने सामन्यादरम्यान सर्वाधिक नो बॉलही टाकले. अशातच दुसरा कसोटी सामना होण्याआधी अक्षर दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे नदीमचे दुसऱ्या कसोटीतून बाहेर होणे निश्चित आहे.

याबरोबरच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या कसोटीत फलंदाजीत दमदार प्रदर्शन केले होते. परंतु त्याचे गोलंदाजी प्रदर्शन अतिशय वाईट राहिले. दोन्ही डावात तो एकाही इंग्लंडच्या फलंदाजाला बाद करू शकला नाही. अशात ‘चायनामन’ कुलदीप यादवला अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

इंग्लंड संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी सामन्याच्या एक दिवसआधीच १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आली आहे. तसेच रोटेशन पॉलिसी नियमानुसार, पहिल्या कसोटीत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जेम्स अंडरसन, डोमिनिक बेस आणि जोस बटलरला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी ओली स्टोन, मोईन अली, बेन फोक्स आणि ख्रिस वोक्स यांची निवड करण्यात आली आहे.

भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

इंग्लंडची संभावित प्लेइंग इलेव्हन-
डोमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, जॅक लीच, ख्रिस वोक्स, ऑली स्टोन/स्टुअर्ट ब्रॉड

महत्त्वाच्या बातम्या-

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना; पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज

केवळ ब्रेंडन मॅक्यूलमचे नाव असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता मोहम्मद रिजवाननेही मिळवले स्थान

चाळीशी पार करून ‘पठ्ठ्या’ उतरलाय आयपीएलच्या लिलावात, एकेकाळी खेळला होता विराटसोबत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---