---Advertisement---

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये आज (रविवार, १८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

मागील सलग २ सामने जिंकत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. अशात हा सामनाही जिंकत विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या हातून मागील सामन्यात दारुण पराभवाला सामोरे गेलेला केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने मैदानावर उतरेल.

अशात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. आरसीबीचा कर्णधार कोहली या सामन्यातही शाहबाज अहमद, हर्षल पटेल या मॅच विनर खेळाडूंसह मैदानावर उतरु शकतो. तसेच देवदत्त पड्डीकल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स हे विस्फोटक फलंदाजही अंतिम ११ जणांच्या पथकात राहणे ठरल्यात जमा आहे.

केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गन मागील सामन्यातील चुका टाळत हंगामातील दुसरा विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसेल. अशात या सामन्यातही अष्टपैलू आंद्रे रसेलकडून त्याला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सोबतच शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी या वरच्या फळीतील फलंदाजांकडूनही संघाला भक्कम सुरुवात मिळण्याची आशा त्याला असेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: 
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, वॉशिंग्टन संदर, हर्षल पटेल, कायल जेमीसन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, डॅनियल क्रिश्चियन

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग:
शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंह, प्रसिद्ध कृष्णा

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ ची दणक्यात सुरुवात केलेल्या बेंगलोरसाठी आणखी एक आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू झाला संघात सामील

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

गलती से मिस्टेक! वादळी खेळी केल्यानंतर बेअरस्टो हिट विकेट झाल्याचे पाहून चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---