---Advertisement---

गलती से मिस्टेक! वादळी खेळी केल्यानंतर बेअरस्टो हिट विकेट झाल्याचे पाहून चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल

On: रविवार, एप्रिल 18, 2021 1:34 AM
---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ९ वा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने १३ धावांनी जिंकला. असे असले तरी या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने केलेली वादळी खेळी आणि त्याची विकेट चर्चेचा विषय ठरली.

जॉनी बेअरस्टोची बादळी खेळी 
या सामन्यात मुंबईने हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी बेअरस्टोने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने डावाच्या तिसऱ्याच षटकात ट्रेंट बोल्ट सारख्या अनुभवी गोलंदाजाविरुद्ध चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. या षटकात बेअरस्टोने ३ चौकार आणि १ षटकारासह तब्बल १८ धावा चोपल्या. त्यानंतरही त्याची बॅट तळपली. त्याने चौथ्या षटकातही २ षटकार तर पाचव्या षटकात १ षटकार खेचला.

बेअरस्टो झाला हिट विकेट
अखेर बेअरस्टोची आक्रमक खेळी त्याच्या एका चूकीमुळे थांबली. ८ व्या षटकात कृणाल पंड्याने टारलेल्या दुसऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात त्याचा पाय स्टंपला लागला आणि स्टंपवरील बेल्स पडल्या. त्यामुळे बेअरस्टो हिट विकेट झाला. त्याने २२ चेंडूत ४३ धावांवर आपली विकेट गमवावी लागली. या खेळीत बेअरस्टोने ४ षटकार आणि ३ चौकार मारले.

चाहत्यांकडून मीम्स व्हायरल
बेअरस्टोची विकेट या सामन्याला महत्त्वाचे वळण देणारी ठरली. तो बाद झाल्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. परिणामी, हैदराबादला चांगली सुरुवात मिळूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बेअरस्टो वादळी खेळी केल्यानंतर हिट विकेट झाल्याने चाहत्यांकडून अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले.

एका ट्विटरकर्त्याने ‘मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम (मारणारही मीच आणि वाचवणारही मीच)’ असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले. तर दुसऱ्या एका ट्विटरकर्त्याने ‘गलती से मिस्टेक’ असे शब्द लिहिलेले मीम शेअर केले आहे. आणखी एका ट्विटरकर्ताने ‘ये तोफा हमने खुद को दिया हैं (ही भेट आम्ही स्वत:लाच दिली आहे.)’ असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे.

https://twitter.com/iSmokII15/status/1383464172118179853

https://twitter.com/Kavita_1907/status/1383464833408913423

https://twitter.com/Kavita_1907/status/1383464434203381764

हैदराबादचा संघ सर्वबाद
बेअरस्टोच्या आक्रमणानंतर मात्र हैदराबादकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. बेअरस्टो नंतर केवळ वॉर्नरला सर्वाधिक ३६ धावांची खेळी करता आली. मात्र तो १२ व्या षटकात धावबाद झाला. त्याच्यानंतर विराट सिंगने ११ आणि विजय शंकरने २८ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. त्यामुळे हैदराबादला १९.४ षटकात सर्वबाद १३७ धावाच करता आल्या.

मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहरने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.

मुंबईच्या १५० धावा 
मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या होत्या. मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तसेच किरॉन पोलार्डने नाबाद ३५ आणि कर्णधार रोहित शर्माने ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला १५० धावांचा टप्पा पार करता आला.

हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

केवळ अविश्वसनीय! एकाच सामन्यात हार्दिकचे दोन जबरदस्त रनआऊट, पाहा व्हिडिओ

या इंग्लिश फिरकीपटूने करून दिली वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ ची आठवण, पाहा व्हिडिओ

हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---