ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिवसाला बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही वॉर्न व त्याच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ बद्दल बर्याचदा चर्चा होत असते. २८ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे ऍशेस कसोटी मालिकेच्या कसोटी सामन्यात वॉर्नने इंग्लंडच्या माइक गॅटिंगला बाद केलेल्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हटले गेले होते.
त्यानंतर, त्यानंतर आता इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप २०२१ मध्ये ही काहीशी अशीच घटना घडली. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा २४ वर्षीय लेगस्पिनर मॅट पार्किन्सनने लँकशायरकडून खेळताना नॉर्थम्पशायरच्या ऍडम रॉसिंग्टनला वॉर्नसारखा चेंडू टाकून बाद केले. त्यामुळे पार्किन्सनच्या या चेंडूची वॉर्नच्या चेंडूशी तुलना केली जात आहे.
पार्किन्सनचा प्रताप
ज्या चेंडूवर पार्किन्सनने रॉसिंग्टनला बाद केले तो चेंडू त्याने लेग स्टंपच्या बाहेर फेकला. तेथून तो चेंडू इतका वळला की, ऑफ स्टंपला जाऊन धडकला. थोड्या काळासाठी फलंदाजाला काय घडले ते समजले नाही. परंतु, जेव्हा त्याने विरोधी संघातील खेळाडूंना आनंद साजरा करताना पाहिले तेव्हा त्याला समजले की, आपल्याला तंबूचा रस्ता धरावा लागला आहे. हा चेंडू वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ प्रमाणे असल्याचे अनेक जण म्हणत आहेत.
Ball of the century? ???? @mattyparky96 #LVCountyChamp live: https://t.co/SyebMiubg3 pic.twitter.com/Wf93spCqz3
— Rothesay County Championship (@CountyChamp) April 16, 2021
वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंचुरी’
सन १९९३मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत शेन वॉर्नने टाकलेल्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ असे नाव देण्यात आले होते. मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २८९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचे सलामीवीर ग्रॅहम गूच आणि माईक आथरटन यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली.
आथरटन बाद झाल्यानंतर माईक गॅटिंग फलंदाजीला आले. ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी चेंडू शेन वॉर्नकडे सोपविला. वॉर्नचे हे सामन्यातील पहिले षटकक होते. गॅटिंग ४ धावांवर खेळत होते. वॉर्नने उंची दिलेला चेंडू टाकला. जो लेग स्टंपच्या बाहेर पडला. प्रत्येकाला वाटले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाईल. मात्र, त्यानंतर झाले ते पाहून सर्वजण थक्क झाले. चेंडू गॅटिंगच्या ऑफ स्टंपला जाऊन धडकला. त्यानंतर, या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हटले गेले. पुढे एका कार्यक्रमात वॉर्नने हा चेंडू म्हणजे एक आकस्मिक घटना होती, असे म्हटलेले.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी






