---Advertisement---

बेअरस्टोची चलाखी! टिपला ‘हा’ भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 11:48 PM
---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२१ हंगामातील नववा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हंगामातील दुसरा विजय संपादन केला. मात्र, या सामन्यात हैदराबादचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने एक नेत्रदीपक झेल टिपला.

बेअरस्टोचा अप्रतिम झेल
मुंबई इंडियन्सचा डावातील सतरावे षटक हंगामातील आपला पहिला सामना खेळणारा मुजीब उर रहमान टाकत होता. मुंबई इंडियन्ससाठी इशान किशन व कायरन पोलार्ड मैदानावर होता. किशन हा चाचपडत खेळत होता. षटकातील पाचवा चेंडू मुजीबने चांगलाच वळवला. मधल्या यष्ट्यीवरून वळलेला हा चेंडू किशनच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकडे गेला. त्याने चपळाईने डावीकडे जात हा चेंडू झेलला. त्यामुळे किशन १२ धावांवर बाद झाला. बेअरस्टोच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेअस्टोची आक्रमक फटकेबाजी
स्पर्धेत प्रथमच सलामीला उतरलेल्या जॉनी बेअरस्टोने हैदराबादला तुफानी सुरुवात केली. त्याने २२ चेंडूत ३ चौकार व ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावल्या. हैदराबादच्या डावातील आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो हिटविकेट होऊन तंबूत परतला.

हैदराबादचा पुन्हा पराभव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. मुंबईसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० धावा बनविल्या. तर, रोहित शर्माने ३२ व कायरन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. हैदराबादसाठी विजय शंकर व मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात, स्पर्धेत प्रथमच सलामीला उतरलेल्या जॉनी बेअरस्टोने हैदराबादला वेगवान सुरुवात केली. त्याने २२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नर ३५ धावा काढून दुर्देवरित्या धावबाद झाला‌. मधल्या फळीतील युवा फलंदाजांना हा दबाव पेलवला नाही. हैदराबादचा संघ १९.४ षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला आणि हैदराबादला स्पर्धेतील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या –

अभिनंदन पॉली! गेल, डिव्हिलियर्सनंतर आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा परदेशी क्रिकेटर बनला पोलार्ड

काय सांगता! हैद्राबादचा ‘हा’ खेळाडू तब्बल ६२ सामन्यात एकदाही झाला नाहिये शून्यावर बाद

MI vs SRH : मुंबईच्या तोफखान्याचा भेदक मारा! हैदराबादला १३७ धावांमध्ये गुंडाळत साकारला हंगामातील दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---