---Advertisement---

केवळ अविश्वसनीय! एकाच सामन्यात हार्दिकचे दोन जबरदस्त रनआऊट, पाहा व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 18, 2021 12:50 AM
---Advertisement---

चेन्नईच्या एम ए स्टेडियमवर आयपीएल २०२१ हंगामातील नववा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १३ धावांनी खिशात घालत सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने लाजवाब क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवले. त्याने केलेल्या दोन भन्नाट धावबादांचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

हार्दिक पंड्याचे लाजवाब क्षेत्ररक्षण
मुंबई इंडियन्सचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू असलेला हार्दिक पंड्या आयपीएलच्या या हंगामात फलंदाजीत तितकासा फॉर्ममध्ये दिसला नाही. मात्र, त्याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात कमाल दाखवली. प्रत्येक षटकागणिक सामन्याचे पारडे फिरत असताना त्याने आपल्या अचूक थ्रोने हैदराबादच्या दोन प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

मुंबईने दिलेल्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो व कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी हैदराबादला चांगली सुरुवात दिली होती. बेअरस्टो बाद झाल्यानंतर वॉर्नरने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. तो हळूहळू लक्षाकडे आगेकूच करत होता. मात्र, १२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला आणि हार्दिकच्या पॉईंटवरून केलेल्या अचूक थ्रोने त्याला धावबाद व्हावे लागले. वॉर्नरने ३६ धावा बनविल्या.

हार्दिकने दुसरा धावबाद आक्रमक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अब्दुल समदच्या रुपाने केला. विजयासाठी १५ चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना समदने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकने मिड ऑफवरून अचूक थ्रो मारत समदची खेळी आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. त्याच्या या दोन्ही धावबादेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

या इंग्लिश फिरकीपटूने करून दिली वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ ची आठवण, पाहा व्हिडिओ

हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

बेअरस्टोची चलाखी! टिपला ‘हा’ भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---