---Advertisement---

आज वॉर्नर-मॉर्गनमध्ये होणार काट्याची टक्कर; ‘अशी’ असेल SRH आणि KKR ची प्लेइंग इलेव्हन?

On: रविवार, एप्रिल 11, 2021 12:37 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत २ सामने पार पडले आहेत. रविवार रोजी (११ एप्रिल) या हंगामातील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी ७.३० वाजता हे दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत.

डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील हैदराबाद आणि ऑयन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघात एकाहून एक स्टार खेळाडू उपलब्ध आहेत. अशात या उभय संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

आजवर दर आयपीएल हंगामात सातत्याने दमदार प्रदर्शन करणारा हैदराबाद संघ यंदा अजून मजबूत झाल्याचे दिसत आहे. भुवनेश्वर कुमारसारख्या अनुभवी खेळाडूचे फॉर्ममध्ये परतणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. याबरोबरच गोलंदाज टी नटराजन आणि राशिद खान हेदेखील कमालीच्या लयीत आहेत. त्यामुळे त्यांना अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळणे निश्चित आहे. याखेरीज त्यांच्याकडे कर्णधार वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे यांसारखे धाकड फलंदाजही आहेत, जे विरोधी संघाच्या गोलंदाजांना थकवून सोडू शकतात.

दुसरीकडे गतवर्षी प्ले-ऑफमध्ये पोहोचू न शकलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ हंगामातील पहिलीच लढत जिंकत दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. अशात शुबमन गिल, नितीश राणा, आंद्रे रसेल या विस्फोटक फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तसेच कर्णधार मॉर्गन  सध्या चांगल्या लयीत असलेल्या गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्याचा विचार करु शकतो.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नगरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

महत्त्वाच्या बातम्या-

बेटे शेर हो तुम, मौज कर दी..! विजयानंतर धवनकडून शॉचे विशेष अंदाजात कौतुक, पाहा धमाल व्हिडिओ 

काय सांगता! ग्लेन मॅक्सवेलला लिलावापूर्वीच देण्यात आली होती आरसीबीची कॅप; विराटचा गौप्यस्फोट

विकेट मिळेना म्हणून मोईन अलीचा रडीचा डाव, केलं असं काही की फलंदाजासह धोनीही चकित; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---