शनिवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सलामी फलंदाजानी तुफान फटकेबाजी करत सामना एकहाती जिंकवून दिला. दरम्यान चेन्नई संघाचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने असा काही चेंडू टाकला, जो पाहून फलंदाजांसह एमएस धोनी देखील आश्चर्यचकित झाला होता.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेले दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले होते. या दोन्ही फलंदाजांना बाद करणे कठीण दिसून येत होते.
त्यावेळी १३ वे षटक टाकण्यासाठी धोनीने, मोईन अलीला बोलावले होते. मोईन अलीने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज शिखर धवनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु मोईन अलीला अंदाज आला होता की, धवन पुढे येऊन शॉट खेळणार आहे. म्हणून त्याने फुल टॉस चेंडू टाकला. जो एकही टप्पा न घेता धवनच्या डोक्यावरुन थेट धोनीच्या हाती गेला होता. हा चेंडू पाहून धवन आणि धोनी हे दोघेही आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर अंपायरने हा चेंडू नो बॉल घोषित केला होता.
https://twitter.com/kunalJammu/status/1380929286132011008?s=20
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून धावांचा पाठलाग करताना शिखर धवनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉ याने ७२ धावांचे योगदान दिले होते. तर रिषभ पंत याने १५ आणि मार्ककस स्टोइनिसने १४ धावांची खेळी केली होती. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
CSKvDC: खराब क्षेत्ररक्षण ते विकेट्सची कमी, ‘ही’ आहेत चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची कारणे
बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक






