---Advertisement---

‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा

On: रविवार, एप्रिल 11, 2021 9:55 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा सामना शनिवारी (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंपुढे अनुभवी चेन्नईची त्रेधातिरपीट उडाली आणि ७ विकेट्सने दिल्लीने सामना खिशात घातला. दरम्यान दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची जबरदस्त फटकेबाजी पाहून इंग्लंडचा दिग्गज मायकल वॉन खूप प्रभावित झाला.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे वॉनने शॉसह भारतीय क्रिकेट संघाचीही स्तुती केली आहे. त्याने लिहिले की, ‘भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभा ठासून भरलेली आहे. त्यांच्याकडे इतके प्रतिभाशाली खेळाडू आहेत की, दोन तगडे संघ ते बनवू शकतात. याच जबरदस्त संघासह ते पूर्ण एक युग क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपावर अधिराज्य गाजवू शकतात.’

एकंदरित वॉनला सांगायचे आहे की, भारतीय क्रिकेट संघाकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ उपलब्ध आहे. त्यामुळे दुखापतीच्या कारणाने अनुभवी खेळाडू अनुपलब्ध असले तरीही भारतीय संघासाठी कोणताही सामना जिंकणे अवघड नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकात ७ बाद १८८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी मिळून संघाचा विजय जवळपास निश्चित केला. त्यातही शॉच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. मागील काही काळातील फ्लॉप कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र टिकेचा धनी ठरलेल्या शॉने या सामन्यातील त्याच्या जबरदस्त खेळीने टिकाकारांची बोलती बंद केली आहे.

अवघ्या ३८ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ७२ धावा चोपल्या. एवढेच नव्हे तर, धवनसोबत मिळून त्याने पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी केली. त्याच्या अतिशी खेळीमुळे दिल्लीला दमदार सुरुवात मिळाली आणि १८.४ षटकात त्यांनी सहज चेन्नईचे लक्ष्य गाठले.

महत्त्वाच्या बातम्या-

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---