भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान हा सामना इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून या काळात खेळला जाईल. त्यानंतर, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना, आणखी एक भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. लवकरच या मालिकांसाठी भारतीय संघाची संघ निवड केली जाणार आहे.
भारतीय संघ खेळणार दोन मालिका
वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये आधी वनडे व त्यानंतर टी२० मालिका खेळेल. १३ जूलैपासून सुरू होणारा हा दौरा २५ जूलैपर्यंत खेळला जाईल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे देण्याचे जवळपास नक्की झाले आहे. तर, प्रशिक्षक म्हणून भारताचे दिग्गज फलंदाज व सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक असलेले राहुल द्रविड भूमिका निभावतील. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात नियमानुसार १७ खेळाडूंना निवडले जाऊ शकते. यामध्ये ६ फलंदाज, ३ अष्टपैलू, २ फिरकीपटू, २ यष्टीरक्षक व ४ वेगवान गोलंदाज असू शकतात.
श्रीलंका दौऱ्यासाठी संभावित भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (निवड तंदुरुस्तीवर अवलंबून), सूर्यकुमार यादव, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), मनिष पांडे, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, राहुल चाहर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन व हर्षल पटेल.
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा-
वनडे मालिका:
१३ जुलै – पहिला वनडे सामना
१६ जुलै – दुसरा वनडे सामना
१८ जुलै – तिसरा वनडे सामना
टी२० मालिका:
२१ जुलै – पहिला टी२० सामना
२३ जुलै – दुसरा टी२० सामना
२५ जुलै – तिसरा टी२० सामना
वनडे व टी२० मालिकेतील सर्व सामने कोरोना महामारीमुळै कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा, कोहली की विलियम्सन, WTC Finalमध्ये कोण घालणार धावांचा रतीब? दिग्गजांनी दिली उत्तरे
धोनीला संघाबाहेर करणाऱ्या माजी निवडकर्त्याने भाष्य; म्हणे, ‘दिग्गजांविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात’






