संपुर्ण नाव- अविष्कार साळवी
जन्मतारिख- 20 ऑक्टोबर, 1981
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, दिल्ली देअरदेविल्स, मुंबई आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 11 एप्रिल, 2003
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 4, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/15
थोडक्यात माहिती-
-मुंबईच्या अविष्कार साळवीची गोलंदाजी शैली ही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राप्रमाणे होती. पण, त्याला मॅकग्रासारखी सातत्यता त्याच्या गोलंदाजीत राहता आली नाही.
-2001-02साली प्रथम श्रेणीत पदार्पण करणाऱ्या साळवीने त्याच्या कामगिरीने खूप कमी काळात निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्यामुळे त्याला 2003साली बांग्लादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेतून भारताच्या वनडे संघात प्रवेश करण्याची संधी मिळाली होती.
-पदार्पणाच्या सामन्याव्यतिरिक्त त्याला आणखी 3 वनडेत खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपला शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2003 साली खेळला.
-2003 साली साळवीने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना त्याच्या प्रेरक मॅकग्राविरुद्ध सामना खेळला होता.
-त्यानंतर साळवीने त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी चालू ठेवली. त्याने 2012-13 पर्यंत देशांतर्गंत क्रिकेट खेळले. याकाळात त्याने 62 प्रथम श्रेणी सामन्यात 169 विकेट्स घेतल्या होत्या.
-2018 साली साळवीची पुदुच्चेरी रणजी ट्रॉफीच्या प्रशिक्षकपदी निवड झाली.