संपुर्ण नाव- अजिंक्य मधुकर रहाणे
जन्मतारिख- 6 जून, 1988
जन्मस्थळ- अश्वि-खुर्द, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, भारत अ, इंडिया ब्ल्यू, भारत क, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, 19 वर्षांखालील भारतीय संघात, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एकादश, मुंबई, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, शेष भारतीय संघ, राईजिंग पुणे सुपरजायंट्स आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 22 ते 24 मार्च, 2014, ठिकाण – दिल्ली
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 3 सप्टेंबर, 2011, ठिकाण – चेस्टर-ले-स्ट्रीट
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 31 ऑगस्ट, 2011, ठिकाण – मँचेस्टर
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 65, धावा- 4203, शतके- 11
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 90, धावा- 2962, शतके- 3
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 20, धावा- 375, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-अजिंक्य रहाणे हा मुंबईजवळील डोंबिवली येथील कुटुंबातील आहे. त्याचे वडील मुंबईतील ट्रान्सपोर्टेशन कंपनीत काम करत होते.
-रहाणेला क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जाते. याशिवाय त्याला कराटेत ब्लॅक बेल्टही मिळाला आहे.
-2002मध्येे राहणेने 15 वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्ध दुबईत 15 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला होता. त्यावेळी त्यासोबत संघात पियुष चावला आणि तन्मय श्रीवास्तव होते.
-2007मध्ये रहाणे 19 वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्यावेळी त्याच्यासोबत संघात विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा हे होते.
-रहाणेने 2007मध्ये कराची अर्बनविरुद्ध मुंबई संघातून आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले. हा सामना मोहम्मद निसार ट्रॉफीतील होता. ही भारत आणि पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा होती. यावेळी रहाणेने 143 धावांची मोठी खेळी केली होती.
-1999साली सचिन तेंडूलकरने न्यूझीलंड अ विरुद्ध केलेल्या 186 धावा या अ दर्जाच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावा होत्या. त्याचा हा विक्रम रहाणेने 2008मध्ये विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्रविरुद्ध 187 धावा करत मोडला. यात त्याच्या 17 चौकारांचा आणि 8 षटकारांचा समावेश होता.
-आयपीएलच्या पहिल्या काही हंगामात रहाणे हा मुंबई इंडियन्सचा भाग होता. पुढे 2015मद्ये त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. यावेळी त्याला त्याचा क्रिकेट आदर्श राहूल द्रविडसोबत खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या संघाला 2 वर्षे निलंबीत करण्यात आल्याने तो पुढे राइजिंग सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला.
-2011मध्ये रहाणे आणि द्रविडने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी20त पदार्पण केले होते. यावेळी रहाणेने 39 चेंडूत 69 धावा केल्या होत्या.
-2012मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत असताना रहाणेने शतक केले होते. यादरम्यान त्याने श्रीनाथ अरविंदच्या षटकात 6 चौकार ठोकले होते. यासह तो टी20त सलग 6 चौकार ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
-2013मध्ये दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर रहाणेने अधिक तर कसोटी सामने हे भारताबाहेर खेळले. न्यूझीलंड, इंग्लंड. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकामध्ये त्याच्या नावावर शतके नोंदलेली आहेत.
-वयाच्या 8व्या वर्षी रहाणेच्या हेलमेटला सलग तीन बाऊंसर्स चेंडूंचा मारा पडला होता. त्यावेळी त्याला गोलंदाजी करणारा व्यक्ती हा त्याच्यापेक्षा तिप्पट वयाने मोठा होता. रहाणे चेंडू लागल्याने काही वेळ रडला होता. पण नंतर त्याने सलग 5 चौकार मारले होते.
-ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), यजुरविंद्र सिंग (भारत), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टिफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हायडन ( ऑस्ट्रेलिया) या क्रिकेटपटूंच्या नावावर कसोटीत एका सामन्यात सर्वाधिक 7 झेल पकडण्याचा विक्रम होता. मात्र ऑगस्ट 2015मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या कसोटीत 8 झेल झेलत रहाणेने त्यांचा हा विक्रम मोडला.
-डिसेंबर 2015ला दिल्लीतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील चौथ्या कसोटी सामन्यात रहाणेने पुनरागमन केले होते. यावेळी सामन्याच्या दोन्ही डावात शतके ठोकत, तो असे करणारा पाचवा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीने त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
-रहाणेने 26 सप्टेंबर, 2014मध्ये त्याची लहानपणीची मैत्रिण राधिका धोपावकरशी लग्न केले.
-2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरु्धच्या कसोटीत विराट कोहलीला खांद्याला दुखापत झाल्याने रहाणे संघाचा कर्णधार बनला होता. तो धरमशालाच्या यशस्वी कसोटीतही संघाचा कर्णधार होता.